‘स्पायडर मॅन’सह अनेक सुपरहिरोंचे जनक ‘स्टॅन ली’ यांचे निधन – eNavakal
आघाडीच्या बातम्या मनोरंजन विदेश

‘स्पायडर मॅन’सह अनेक सुपरहिरोंचे जनक ‘स्टॅन ली’ यांचे निधन

लॉस एंजेल्स – मार्वल कॉमिक्सचे जनक आणि स्पायडर मॅन, हल्क अशा अनेक सुपर हिरोंना जन्म देणारे स्टॅन ली यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. अमेरिकेतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच काळापासून ते अनेक आजारांशी झुंज देत होते.

स्टॅन ली यांचा जन्म २८ डिसेंबर १९२२ साली न्यूयॉर्कमध्ये झाला. 1961 साली त्यांनी ‘द फॅन्टॅस्टीक फोर’सह मार्वल कॉमिकची सुरुवात केली. काही काळाने यात स्पाइडर मॅन, एक्स मॅन, हल्क, आयरन मॅन, ब्लॅक पँथर, थोर, डॉक्टर स्टैंज आणि कॅप्टन अमेरिका या सुपरहिरोंच्या पात्रांची समावेश केला. या सर्व पात्रांवर चित्रपट निर्माण झाले, हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफानी गाजले. तसेच मार्वलच्या आतापर्यंतच्या बहुतेक चित्रपटांमध्ये स्टॅन ली यांनी कॉमिओ रोल केला आहे. त्यांच्या कॉमिक्स जगप्रसिद्ध आहेतच मात्र त्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथादेखील लिहिल्या.

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
देश

येडीयुरप्पा अडचणीत! मंत्री, आमदार नाराज

बंगळुरू – काँग्रेस, जनता दल (सेक्युलर) व अपक्ष आमदारांना फोडून, कुमारस्वामी सरकार पाडून कर्नाटकात सत्तेवर आलेल्या भाजपाच्या येडीयुरप्पा सरकारलाच आता आमदारांच्या बंडखोरीचा सामना करावा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र वाहतूक

मंगला एक्स्प्रेसचं इंजिन बिघडलं! मध्य रेल्वेचा आजही खोळंबा

ठाणे – सलग दुसऱ्या दिवशी मध्य रेल्वे खोळंबली असून प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. टिटवाळा येथे मंगला एक्सप्रेसच्या इंजिनात बिघाड झाल्याने कसाऱ्याच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

…तर पुन्हा विमा कंपन्यांविरोधात आंदोलन! उद्धव ठाकरेंचा दोन्ही सरकारना इशारा

मुंबई – महाराष्ट्रातील पूरसमस्या ओसरल्यावर शिवसेनेने महाराष्ट्रातील शेतकर्‍यांच्या पीक विमा प्रश्‍नावर पुन्हा लक्ष केंद्रीत केले आहे. शिवसेनेने जून महिन्यात शेतकर्‍यांच्या पीक विम्याचे पैसे न...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

संभाजी ब्रिगेडकडून विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर

औरंगाबाद – राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. यंदा संभाजी ब्रिगेड संघटनाही स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी,...
Read More
post-image
देश

जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांच्या घरावर, कार्यालयांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली – दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या जेट एअरवेजच्या दिल्ली आणि मुंबईतील कार्यालयांवर अंमलबजावणी संचालनालय (ईडी)ने छापेमारी केली आहे. तसेच जेट एअरवेजचे संस्थापक नरेश...
Read More