स्थायी समितीने १९७ कोटी रुपयांची वाढ; अर्थसंकल्पाला दिली मंजुरी – eNavakal
अर्थ मुंबई

स्थायी समितीने १९७ कोटी रुपयांची वाढ; अर्थसंकल्पाला दिली मंजुरी

नवी मुंबई – महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी सन २०१८-१९ सालासाङ्गी ३ हजार १५१ कोटी ९३ लाख रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला होता. यात स्थायी समितीने चर्चेअंती १९७ कोटी रुपयांची वाढ करून एकतर्फी मंजुरी दिली. पालिका इतिहासात प्रथमच विरोधकांना अर्थसंकल्पाच्या ताळेबंदाबाबत विश्वासात न घेतल्याने त्यांनी सभात्याग केला.

या अर्थसंकल्पावर चर्चा करण्यासाङ्गी तीन वेळा  बैठका घेण्यात आल्या,  मात्र आजच्या शेवटच्या बैठकीत सत्ताधार्‍यांचा सावळागोंधळ अधिकच दिसून आला. सुरुवातीला २ वाजता बोलावलेली सभानंतर अचानक ४.३० वाजता घेण्याचे जाहीर करूनही प्रत्यक्षात साडे पाच वाजेपर्यंत सभाच सुरू केली नाही. त्यामुळे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेत ही सभा नियमानुसार नसल्याचे सांगितले. यासंदर्भात काही कादेशीर बाब निर्माण झाल्यास त्याला आम्ही जबाबदार नसल्याचे विरोधकांनी स्पष्ट केले. त्यानंतर सभा सुरू होताच सत्ताधार्‍यांनी अर्थसंकल्पात खर्चाच्या बाजूत नेमक्या कोणत्या बाबी कमी जास्त केल्या हे न सांगताच केवळ पान क्रमांक १ ते १० वर लिहिल्याप्रमाणे बदल करण्यात यावा, अशा सूचना केल्या. त्यावर शिवसेनेचे द्वारकानाथ भोईर व नामदेव भगत यांनी आक्षेप घेत अशाप्रकारे नेमक्या कोणती कामे कमी केली व कोणती नव्याने समाविष्ठ केली याची माहिती सर्व सदस्यांना होत नसल्याने ती सर्व वाचून दाखवावी अशी मागणी केली. त्याला सत्ताधार्‍यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे विरोधकांनी सत्ताधार्‍यांचा निषेध करत सभात्याग केला. त्यानंतर सभापतींनी जमा व खर्चाच्या बाजुतील अंतिम तरतुद स्पष्ट करत आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकात १९७ कोटीं रुपयांची वाढ करून तो मंजूर केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News विदेश

आज भारत-पाकिस्तान पुन्हा मुकाबला

दुबई- एशिया चषक क्रिकेट  स्पर्धेत उद्या भारत-पाकिस्तान या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये पुन्हा एकदा मुकाबला रंगणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात गटातील सामन्यात हे दोन संघ बर्‍याच...
Read More
post-image
News मुंबई

गांधी जयंतीला ’सेवाग्राम’मध्ये काँग्रेसची राष्ट्रीय कार्यकारिणी

मुंबई- महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीनिमित्त वर्धा येथील सेवाग्राम येथे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीची बैठक येत्या 2 ऑक्टोबरला आयोजित करण्यात आली आहे. आगामी काळात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईच्या सुनियोजित विकासाला चालना मिळणार

मुंबई- मुंबईचे नागरी पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा सुधारित विकास आराखडा-2034 सह विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034 हे शासनाच्या मंजुरीने 01...
Read More
post-image
क्रीडा विदेश

पाकिस्तानने अफगाणिस्तानची विजयी दौड रोखली

अबुधाबी – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सलग दोन सामने जिंकणार्‍या अफगाणिस्तान संघाची विजयी दौड अखेर पाकिस्तानने सुपर-4 मधील पहिल्या लढतीत रोखली. अगोदर गटातील दोन्ही...
Read More
post-image
क्रीडा

रोहित शर्माचे सर्वाधिक षटकार

नवी दिल्ली – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेत चांगली फलंदाजी करणार्‍या कर्णधार रोहित शर्माने षटकारांच्या बाबतीत आणखी एक विक्रम केला. गेल्या 10 वर्षात रोहितने सातत्याने...
Read More