स्टेफानोसने केले जोकोचे ‘पॅकअ‍ॅप’ – eNavakal
क्रीडा

स्टेफानोसने केले जोकोचे ‘पॅकअ‍ॅप’

टोरॅन्टो – नुकत्याच झालेल्या विम्बल्डन स्पर्धेत जोकोने जेतेपद पटकावून आपले 13वे ग्रॅण्ड स्लॅम विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर प्रथमच तो टोरॅन्टो स्पर्धेत सहभागी झाला होता. पहिला सेट जिंकून स्टेफानोसने या सामन्यात चांगली सुरुवात केली. पुढचा सेट जोकोने जिंकून सामन्यात जोरदार कमबॅक केले, पण निर्णायक तिसर्‍या सेटमध्ये स्टेफानोसने 2-0 अशा पिछाडीवरून पुढचे सलग 6 गेम जिंकून सामना आणि सेट खिशात टाकला. त्याने आक्रमक खेळ केला.

फोर हॅण्ड, बॅक हॅण्डचा प्रभावी वापर करून त्याने बरेच गुण वसूल केले. तसेच जोकोची सर्व्हिस भेदण्यातदेखील त्याला यश आले. दुसर्‍या फेरीच्या सामन्यात त्याने सातवे मानांकन देण्यात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या डॉमनिक थिएमलादेखील पराभूत केले होते. आता चौथ्या फेरीत त्याचा मुकाबला ज्वेरवशी होणार आहे. ज्वेरवने दुसर्‍या लढतीत रशियाच्या डॅनियलला पराभूत केले. प्रथम मानांकन प्राप्त राफेल नादालने चौथी फेरी गाठताना वॉवरिंकावर सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. पण हा सामना जिंकण्यासाठी नादालला जोरदार संघर्ष करावा लागला. दोन्ही सेट त्याने टायब्रेकवर जिंकले. इतर सामन्यात केव्हिन अँडरसन्स, गिगोर दिमोत्रौ आणि कॅरेन केलचोनव यांनी विजय मिळवला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता अटक

मुंबई,  – खलिस्तान निर्मितीचा पुरस्कर्ता असलेल्या एका 45 वर्षांच्या संशयित आरोपीस पुणे एटीएसने अटक केली आहे. त्याचा दहशतवादी कृत्यामध्ये सहभाग असल्याचे काही पुरावे एटीएसच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More