स्टेट बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याज दरात कपात – eNavakal
News महाराष्ट्र

स्टेट बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! व्याज दरात कपात

मुंबई – देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांसाठी मोठी घोषणा केली आहे. एसबीआयने ग्राहकांना आणखी एक खुशखबर दिली आहे. बँकेने व्याजदर आणखी कमी केलं आहे. एसबीआयने 0.10 टक्क्यांनी व्याजदर कमी केले आहे. यामुळे होम लोन आणखी स्वस्त होणार आहे. एसबीआयचे हे नवे व्याजदर 10 ऑक्टोबरपासून लागू होणार आहेत. एका वर्षात लोनचे एलसीएलआर कमी होऊन 8.05 टक्क्यांवर आले आहे. पण रेपो रेटशी संबंधित लोनवर हे लागू होणार नाही. यावर्षी सहाव्यांदा एसबीआयने एमसीएलआरमध्ये कपात केली आहे. रिझर्व बँक ऑफ इंडियाने मागील आठवड्यात रेपोरेटमध्ये 0.25 टक्क्यांनी कपात केली होती.
रेपो रेट कमी झाल्यामुळे व्याजदर कमी करण्याचा देखील दबाव असतो. रेपो रेट तो दर असतो ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. हा रेट जेवढा कमी होणार तेवढा फायदा बँकांना होतो. तर बँक देखील ग्राहकांना याचा फायदा देण्यासाठी व्याजदर कमी करते. आरबीआयकडून देखील अनेकदा रेपोरेटमध्ये कपात करण्यात आली आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

कोल्हापुरात उड्डाण पुलाखाली स्फोट; एकाचा मृत्यू

कोल्हापूर – राज्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू असताना कोल्हापुरात शुक्रवारी भीषण स्फोट झाला. पुणे-कोल्हापूर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला. ही घटना शक्रवारी रात्री अकरा...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

‘चंपा’ कोणी तयार केला, हे निवडणुकीनंतर सांगेन – अजित पवार

पुणे – माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी महसूलमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना चंपा असे संबोधल्यानंतर राज्यभरात या नावाची चांगलीच चर्चा झाली. त्यानंतर...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More