स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा – अण्णा हजारे – eNavakal
आंदोलन देश

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करा – अण्णा हजारे

नवी दिल्ली – स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशीच्या मागणीने आता जोर धरला आहे. पेपरफुटी प्रकरणी दिल्लीत आज सहाव्या दिवशीही विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. आज सामजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पेपरफुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना शांततेने आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच अण्णा हजारे यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केलेली आहे.

दरम्यान, दिल्लीच्या लोधी रोड परिसरात देशभरातून आलेले विद्यार्थी आंदोलन करत असून पेपरफुटी प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी करत आहेत. याआधी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तसेच या मागणीसाठी देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. आज सकाळी काही विद्यार्थ्यांनी पटना येथील राजेंद्र नगर  रेल्वे रुळांवर उतरून रेलरोको करण्याचा प्रयत्नही केला. यासह छात्र जन अधिकार परिषदेनेही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.

सविस्तर वृत्त थोड्यावेळात…

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
क्रीडा विदेश

गॅरी स्टेड नवे प्रशिक्षक

वेलिंग्टन – न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी त्यांचे माजी फलंदाज गॅरी स्टेड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जून महिन्यात अगोदरचे प्रशिक्षक असलेल्या माइक हेसन यांनी...
Read More
post-image
News मुंबई

म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघणार

मुंबई- म्हाडाची मुंबई शहरसाठी अंदाजे एक हजार घरांची ऑक्टोबर महिन्यात लॉटरी निघाणार असल्याची शक्यता मुंबई मंडळाच्या कार्यालयातून वर्तविण्यात आली आहे. म्हाडाच्या गृहनिर्माण कोकण मंडळाने मुंबई...
Read More
post-image
News मुंबई

पालिका एच-पूर्व कार्यालयाची ‘पाणी वाचवा’ मोहीम कागदावर

मुंबई- पिण्याचे पाणी वाचवा चोरी रोखा पाणी वाया घालवू नका, अशी जनजगृती मोहीम पालिका एच – पूर्व कार्यालयचे पाणी खाते हाती घेणार होते. पण ही...
Read More
post-image
क्रीडा विदेश

मुरलीने ब्लादिमीरला नमवले

अबुधाबी – अबुधाबी आंतरराष्ट्रीय मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या मुरली कार्तिकेयनने सातव्या फेरीत रशियाच्या ब्लादिमीरला फेडोसीवला पराभूत करून स्पर्धेत खळबळ माजवली. या पराभवामुळे स्पर्धेच्या जेतेपदाच्या शर्यतीमधून...
Read More
post-image
News मुंबई

महान क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

मुंबई – भारताला परदेशात कसोटी मालिका जिंकून देणारे पहिले कर्णधार अजित वाडेकर यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी मुंबईतील...
Read More