स्काय वॉकवर फेरिवाल्यांना बसू द्या, बाबूभाई भवानजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी – eNavakal
News मुंबई

स्काय वॉकवर फेरिवाल्यांना बसू द्या, बाबूभाई भवानजींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई – मुंबई आणि उपनगरातील स्काय वॉकवर फेरिवाल्यांना बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी भाजप हॉकर्स युनिटचे अध्यक्ष बाबूभाई भवानजी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मनपा आणि पोलिसांकडून होणार्‍या कारवाईमुळे स्टेशन परिसरातील जुने फेरिवाले बेरोजगार झाले आहेत. पण मुंबई आणि उपनगरातील जे स्काय वॉक आहेत. त्याचा परिपुर्ण नागरिक उपयोग करत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. या स्काय वॉकवर फेरिवाल्यांना बसण्याची परवानगी द्यावी त्यामुळे पादचारी स्काय वॉकचा वापर करु लागतील. तसेच रेल्वे स्थानक आणि जवळच्या परिसरात रहदारीसह गर्दीचे विभाजन होण्यास मदत होईल. फेरिवाल्यांना रोजगार परत मिळेल. सरकारला उत्पन्न मिळेल, मनपा अधिकारी आणि पोलीस कर्मचार्‍यांची अरेरावी थांबेल आणि भ्रष्टाचारासही आळा बसेल, असे भवानजी यांनी निवेदनातून सांगितले आहे. ज्या ठिकाणी स्कायवॉक नाहीत, अशा ठिकाणी आपण फॅशन स्ट्रीट, चर्चगेट, फॅशन स्ट्रीट लिंकिंग रोड, वांद्रे डबल-डेकर मॉडेलमध्ये ही सुविधा करता येईल, असेही त्यांनी निवेदनातून सांगितले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (२०-०३-२०१९)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटीन (०१-०६-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (०७-०७-२०१८) नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

समझौता एक्स्प्रेस स्फोट प्रकरण : सर्व आरोपींची मुक्तता

नवी दिल्ली – 12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे. या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

टीव्हीवर ‘हे’ भाषण ऐकण्यासाठी पवारांनी बैठक थांबवली

मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान टीव्हीवर एक भाषण लागलं आणि पवारांनी चक्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

शमीला वर्ल्ड कपसाठी पुरेशी विश्रांती मिळणार

मुंबई – इंडियन प्रीमिअर लीगमध्ये भारतीय संघातील खेळाडूंवर पडणाऱ्या अतिरिक्त तणावावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आगामी वर्ल्ड कपचं महत्त्व लक्षात घेता किंग्स इलेव्हन पंजाब...
Read More