स्कायमेटचा धोक्याचा इशारा! ‘यावर्षीही कमी पाऊस, दुष्काळाची भीती’ – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश हवामान

स्कायमेटचा धोक्याचा इशारा! ‘यावर्षीही कमी पाऊस, दुष्काळाची भीती’

नवी दिल्ली – ‘स्कायमेट वेदर’ ही हवामानाचा व पावसाचा अचूक अंदाज घेणारी संस्था आहे. या संस्थेने २०१९ च्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. यावर्षी जून ते सप्टेंबर महिन्यात म्हणजेच पावसाच्या मोसमातच सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असून देशातील महाराष्ट्रासहीत अनेक राज्यांत दुष्काळ आहे. त्यामुळे सतत सहाव्या वर्षीही भारतवासियांच्या पाचवीला दुष्काळ पुजला आहे. असे चित्र आहे.

स्कायमेट वेदर या हवामान संस्थेचा अंदाज नेहमीच भारतीय हवामान संस्थेपेक्षा अधिक अचूक असतो. स्कायमेटने सांगितले आहे की, प्रशांत महासागरातील हवामान स्थिर नसल्याने पाऊस कमी पडेल. हा पाऊस सरासरीच्या ९१ टक्क्यांपेक्षा कमी असेल. त्यामुळे भारताच्या पूर्व, मध्य आणि दक्षिणेकडील राज्यात कमी पावसामुळे दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. स्कायमेटचा हा अदांज आहे.

गेल्या वर्षी भारतीय हवामान खात्याने ९७ टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. मात्र प्रत्यक्षात ९१ टक्के पाऊस पडला व महाराष्ट्रासहीत अनेक राज्यात दुष्काळ पडला होता. गेली ५-६ वर्षे असेच होत आहे. कृषीप्रधान भारताला पावसाचा हा लहरीपणा परवडणार नाही. भारताची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश

चांद्रयान-2 आज करणार चंद्राच्या कक्षेत प्रवेश

नवी दिल्ली – संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या चांद्रयान-2 मोहिमेसाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. चांद्रयान-2 ला चंद्राच्या कक्षेत पोहोचवण्यासाठी इस्त्रोचे वैज्ञानिक आज सकाळी...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

मॉल पार्किंग मोफत देण्याचा कायदा आहे का? मुंबई हायकोर्टाचा पुणे पालिकेला सवाल

मुंबई – पुणेकरांना मॉलमध्ये पार्किंग शुल्क फ्री करण्याबाबत पालिकेचा कायदा आहे का? असा सवाल उच्च न्यायालयाने आज उपस्थित केला. पार्किंगचे शुल्क वसूल करण्यास मनाई...
Read More
post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More