सौरभ वर्मा रशियन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत – eNavakal
News क्रीडा विदेश

सौरभ वर्मा रशियन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत

ब्लादिवोस्टॉक, रशिया – भारताचा माजी राष्ट्रीय विजेता सौरभ वर्माने येथे सुरू असलेल्या रशियन खुल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेची पुरुष एकेरीची अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत सौरभने आपलाच सहकारी मिथून मंजुनाथचा सरळ दोन गेममध्ये पराभव करून आरामात स्पर्धेची निर्णायक फेरी गाठली.

सौरभने ही लढत 21-9, 21-15 अशी सहज जिंकली. अवघ्या 31 मिनिटांत सौरभने या सामन्यात बाजी मारली. दोन्ही गेममध्ये सुरूवातीपासून आक्रमक खेळ करून सौरभने सामन्यावर वर्चस्व गाजविले. दोनही गेममध्ये त्याने घेतलेली ही आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. त्याने फोरहँड आणि बॅकहँडचा शानदार वापर केला. दुखापतीमुळे बरेच महिने बॅडमिंटन कोर्टपासून दूर असलेल्या सौरभने गतवर्षी चायनीज तायपेई मास्टर्स स्पर्धा जिंकली होती. तर 2016 मध्ये बिटबर्गर या
स्पर्धेत तो उपविजेता होता. आता अंतिम फेरीत त्याचा मुकाबला जपानच्या कोकी वॅटेनाबेशी होईल.
मिश्र दुहेरीत भारताच्या कुहू गार्ग आणि रोहन कपूर जोडीनेदेखील अंतिम फेरी गाठली. भारतीय जोडीने मलेशियाच्या चेन-येन जोडीचा तीन गेममध्ये पराभव केला. दुसरे मानांकन देण्यात आलेल्या भारतीय जोडीने ही लढत तीन गेममध्ये जिंकली. आता अंतिम फेरीत त्यांचा मुकाबला. ब्लादिमिर-मीन जोडीशी होणार आहे. भारताची पुरुष दुहेरीची जोडी मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाली. अरुण जॉर्ज-सनमय शुक्ला यांना कॉस्टीन-अ‍ॅलेक्झांडर जोडीकडून हार खावी लागली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

जन्मोजन्मी हीच पत्नी मिळो! पुण्यात पुरुषांनी वटवृक्षाला मारल्या फेऱ्या

पुणे – आज राज्यभरात वटपौर्णिमेचा उत्साह आहे. आजच्या दिवशी वडाच्या झाडाला दोरी बांधून सात फेऱ्या मारतात आणि जन्मोजन्मी हाच पती मिळावा, यासाठी आजच्या दिवशी...
Read More
post-image
देश

नेपाळच्या शाळांमध्ये चीनी भाषेची सक्ती

काठमांडू – नेपाळमधील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना चीनी भाषा शिकणे अनिवार्य करण्यात अआले आहे. सध्या चीन आणि नेपाळ हे दोन देश अधिक जवळ येत असून भाषा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लवकरात लवकर राम मंदिर उभारले जाईल – उद्धव ठाकरे

अयोध्या – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि आपल्या १८ खासदारांसह आज अयोध्येत पोहोचले. रामलल्लाचं दर्शन घेऊन त्यांनी पत्रकार परिषद घेतली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राज्य मंत्रिमंडळ विस्तार! पहिल्या शपथविधीचा मान राधाकृष्ण विखे पाटलांना

मुंबई – लोकसभा निवडणुकीनंतर सतत होणार्‍या टोलवा टोलवीनंतर अखेर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आज रविवारी सकाळी पार पडला असून पहिल्या शपथविधीचा मान काँग्रेस राष्ट्रवादीतून नुकतेच...
Read More
post-image
देश

राजस्थानची सुमन राव ठरली फेमिना मिस इंडिया २०१९

नवी दिल्ली – फेमिना मिस इंडिया या स्पर्धेचा अंतिम टप्पा शनिवारी मुंबईच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये पार पडला. एकूण ३० स्पर्धकांशी लढत आपल्या सौंदर्य...
Read More