सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली-राष्ट्रीय निवडणुक आयोग – eNavakal
News न्यायालय मुंबई

सोशल मीडियासाठी स्वतंत्र नियमावली-राष्ट्रीय निवडणुक आयोग

मुंबई- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या 48 तास अगोदर सोशल मीडियावर प्रसिध्द होणार्‍या पोस्टना आळा घालण्यासाठी लवकरच स्वतंत्र नियमावली जाहीर करणार असल्याची हमी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज अखेर उच्च न्यायालयात दिली.
जाहिरातबाजी तसेच पक्षाच्या प्रचाराबाबत पोस्ट अपलोड केले जातात. त्यावर बंदी घालावी अशी मागणी करणारी जनहित याचिका अ‍ॅड. सागर सुर्यवंशी यांच्यावतीने अ‍ॅड.अभिनव चंद्रचुड यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती एन.एम. जामदार यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने अ‍ॅड. प्रदिप राजागोपाल यांनी सोशल मीडियावर प्रसिध्द होणार्‍या पोस्टना आळा घालण्यासाठी लवकरच स्वतंत्र नियमावली जाहीर केली जाईल असे स्पष्ट करताना आचारसंहितेच्या काळात मतदानाच्या 48 तास आधी सर्व समाज माध्यमांसाठी नियम अधिक काटेकोरपणे राबवले जातील. तसेच मुंबई उच्च न्यायालयात यासंदर्भात याचिकाकर्ते, गुगल, फेसबुक, ट्विटर, युट्यूब यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांचाही विचार केला जाईल अशी लेखी हमी दिली. यावेळी माजमाध्यमांनी त्याचं पालन न केल्यास काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला असता फेसबुके आणि गुगलच्यावतीने आम्ही केवळ खातेधारकांना एक माध्यम उपलब्ध करून देतो. त्यांचा मजकूर हा कुणापर्यंत पोहचावा, कुणापर्यंत नाही याचे संपूर्ण नियंत्रण हे खातेधारकाकडेच असते. याची दखल न्यायालयाने घेतली. आम्ही या संदर्भात योग्य ते निर्देश देऊच मात्र राष्ट्रीय निवडणुक आयोगाने यासंदर्भात कठोर नियम आपल्या अधिकारात तयार करण्याची गरज असल्याचा पुनरूच्चार करून याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
मनोरंजन

#Bond25 लशाना साकारणार ‘AGENT 007’

किंग्स्टन – जगप्रसिद्ध बॉन्ड सिरीजचा २५ वा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ‘सीक्रेट एजंट ००७’ ही अतिशय गाजलेली भूमिका यावेळी कोणी अभिनेता नाही तर एक...
Read More
post-image
देश मुंबई

कर्नाटकच्या बंडखोर आमदारावर मुंबईत उपचार

मुंबई – कर्नाटक विधानसभेत विश्वासदर्शक ठरावावरील चर्चेस सुरुवात झाली आहे. मात्र बंडखोर आमदार यावेळी उपस्थित नसल्याने कुमारस्वामी सरकारवरील संकट कायम आहे. त्यातच मुंबईत असलेले कॉंग्रेसचे बंडखोर...
Read More
post-image
महाराष्ट्र

आंबेनळी घाट बस दुर्घटनेचा तपास थांबण्याची पोलिसांची मागणी

रत्नागिरी – पोलादपूरजवळच्या आंबेनळी घाटात बस कोसळली होती. या दुर्घटनेच्या वर्षभरानंतरही पोलिसांच्या हाती ठोस काहीच लागलेले नाही. त्यामुळे रायगड पोलिसांनी न्यायालयात याप्रकरणाचा तपास थांबविण्याची परवानगी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार

मुंबई – जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली होती. मात्र सध्या आठवडाभरापासून कोकण वगळता इतर भागांत पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. परंतु आजपासून राज्यात पाऊस...
Read More
post-image
मनोरंजन

‘राधिका आपटेचा बोल्ड सीन’ अशीच चर्चा का?

मुंबई – आपल्या बोल्ड अदांनी चाहत्यांना भुरळ घालणारी मराठमोळी अभिनेत्री राधिका आपटे लवकरच स्लमडॉग मिलिनिअर फेम देव पटेल याच्यासह ‘द वेडिंग गेस्ट’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला...
Read More