सोशल मिडियावरुन व्यवसायिकाला 41 लाखांचा गंडा – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

सोशल मिडियावरुन व्यवसायिकाला 41 लाखांचा गंडा

नाशिक – सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख वाढवून, अज्ञात महिलेने व्यावसायिकाला 41 लाख रुपयांचा गंडा घातला. नाशिकमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी महिलेचा शोध सुरु आहे. ब्रिटिशमधील आमच्या कंपनीसाठी औषधी बियांची गरज असते, त्यामुळे त्या बिया खरेदी करुन आम्हाला द्या आणि आम्ही तुम्हाला अधिकचे पैसे देऊ, असा सल्ला महिलेने व्यावसायिकाला दिला. बिया कुणाकडून खरेदी करुन कंपनीपर्यंत पोहोचवायच्या यासंदर्भात महिलेने व्यावसायिकाला सोशल मीडियाच्या माध्यमातूनच संपर्क घडवून दिला.

त्यानुसार व्यावसायिकाने जून 2017 पासून आजपर्यंत सबंधिताच्या बँक खात्यात 41 लाख 64 हजार रुपये जमा करण्यात आले. मात्र अजूनही औषधी बिया मिळाल्या नाहीत. शिवाय, संबंधिताकडून प्रतिसादही मिळत नसल्याचे लक्षात आले. अखेर व्यावसायिकाने पोलिस ठाणे गाठले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याचा संशय व्यक्त केला जात असून त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुख्यमंत्री फडणवीस फक्त नागपूरचाच विकास करतात

परभणी – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज जिल्ह्यात दौर्‍यात आहेत. आपल्या खास शैलीत पत्रकार परिषदेत त्यांनी महाराष्ट्र सरकार आणि भाजप नेत्यावर...
Read More
post-image
News महाराष्ट्र

महिला स्पेशल लोकलसाठी बदलापुरात सेनेची स्वाक्षरी मोहीम

बदलापूर – बदलापूर येथून छत्रपती शिवाजी टर्मिनससाठी गर्दीच्या वेळी महिला स्पेशल लोकल सोडण्याच्या मागणीसाठी बदलापूर येथे शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आज...
Read More
post-image
क्रीडा देश

भारतीय खेळाडूंना पत्नी, प्रेयसीपासून दूर राहण्याचे आदेश

लंडन – टी-20 आणि वन डे मालिका संपल्यानंतर भारतीय संघातील खेळाडूंना संघ व्यवस्थापनाने एक महत्वाचा आदेश दिला आहे. इंग्लंडविरूद्धचे पहिले तीन सामने होईपर्यंत भारतीय खेळाडूंना...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : उंचे लोग उंची पसंद

भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी संपर्क अभियान सुरू केले आहे. म्हणजे समाजातल्या मोठ्याकिंवा प्रतिष्ठित लोकांच्या भेटीगाठी घेण्याचा त्यांनी सपाटा लावला आहे. प्रत्येक राज्यात जाऊन...
Read More
post-image
महाराष्ट्र

नांदेडात चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमध्ये 4 लाखांची लूट

नांदेड – आज पहाटे 4.50 वाजता चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेसमधून चोरट्यांनी 4 लाख 24 हजारांचा ऐवज असलेली एक बॅग चोरून नेली आहे. चैन्नई ते नगरसोल जाणारी...
Read More