सोलापूर शहर-जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बनला गंभीर – eNavakal
News महाराष्ट्र

सोलापूर शहर-जिल्ह्यात पाण्याचा प्रश्न बनला गंभीर

सोलापूर- सोलापूर लोकसभा मतदारसंघातील दुसर्‍या टप्प्याचा प्रचाराची धामधूम सुरू असताना सोलापूर शहरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या गलथान कारभारामुळे विस्कळीत पाणीपुरवठा केला जात आहे. तर ग्रामीण भागामध्ये टँकरने पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. त्यामुळे अक्कलकोट, सांगोला, माळशिरस आदी तालुक्यातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. शहर-जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत
चालला आहे.
दोन आठवड्यापूर्वी सांगोला तालुक्यातील 13 गावच्या ग्रामस्थांनी गावांतील पाणीटंचाईची समस्या तत्काळ सोडवावी अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू असा इशारा प्रशासनाला दिल्यानंतरही प्रशासन याबद्दल गांभीर्याने लक्ष देण्याचे टाळत आहेत. अशाच प्रकारे अक्कलकोट, माळशिरस या तालुक्यातही काही गावांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. ग्रामीण भागामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत वाड्या-वस्त्यावर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, असे सांगितले जाते. परंतु टँकरने केलेला पाणीपुरवठा एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.
सोलापूर शहरातही योग्य नियोजनाअभावी पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होऊनही स्थानिक प्रशासनाकडून गंभीरपणे दखल घेतली जात नाही. अतिरिक्त पाणी याबाबत योग्य नियोजन केले जात नाही. सोलापूर शहरात स्थानिक प्रशासनाकडून एकदाही समतोल प्रमाणात पाणीपुरवठा झाला नाही. शहरात समतोल व सुरळीत स्वच्छ पाणीपुरवठा करवा, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. शहर-जिल्ह्यातील पाणीप्रश्नाबद्दल जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी लक्ष देऊन कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर, अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
देश

कोरोनामुळे देशात मोठी आर्थिक आपात्कालीन परिस्थिती- रघुराम राजन

मुंबई  – आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज लिंक्डइन या सोशल मिाडियावर पोस्ट करून भारतीय अर्थव्यवस्थेवर कोरोना संकटाच्या परिणामांबाबत भाष्य केले. देशात पहिल्यांदाच कोरोनामुळे...
Read More
post-image
विदेश

सिस्टिक फायब्रॉसिसनंतर कोरोनावर मात करणारा हा चिमुकला ठरला डेथ किंग

क्लार्क्सव्हिल – जगभर दहशत पसरलेल्या कोरोनाने सर्वच देशांत आपलं बस्तान मांडलं आहे. अमेरिकेत तर कोरोनाने लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलंय. ३ लाखांहून अधिक लोकांना अमेरिकेत...
Read More
post-image
महाराष्ट्र मुंबई

नवी मुंबईतील कोरोनाबधित रुग्णाचा मृत्यू

नवी मुंबई – कोरोनाची बाधा झालेल्या एका 73 वर्षीय वृद्धाचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील कोरोना बळींची संख्या आता दोन झाली आहे. शहरात रविवारी...
Read More
post-image
Uncategoriz

८ ० वर्षांच्या आजींनी गाठले नवी मुंबई ते रायगड, म्हसळा अंतर

नवी मुंबई  – कोरोनामुळे सध्या संपूर्ण देश ठप्प झाला आहे. याचा परिणाम मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण येथे रोजगारानिमित राहणाऱ्या चाकरमान्यांवर देखील होऊ लागला...
Read More
post-image
Uncategoriz देश

Corona : गंगा नदीच्या प्रदूषणात घट

पाटणा – लॉकडाऊनमुळे देशासह उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक कारखाने आणि कंपन्या बंद आहेत. त्यामुळे गंगा नदीच्या प्रदूषणात घट झाली असून पाटणा परिसरातील गंगा नदी...
Read More