सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द – eNavakal
महाराष्ट्र

सोलापूरची मार्कंडेय महामुनींची रथयात्रा यंदा कोरोनामुळे रद्द

सोलापूर – दरवर्षी श्रावण महिन्यात येणाऱ्या नारळी पौर्णिमेनिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या सोलापुरातील मार्कंडेय महामुनींंची होणारी रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली होती.

दरवर्षी सोलापुरात नारळी पोर्णिमेला मार्कंडेय मंदिरात भव्य उत्सव साजरा करण्यात येत असतो. पहाटे ३ वाजल्यापासून रुद्राभिषेक आणि आरतीने या उत्सवाला सुरुवात होते. तर सकाळी ११ च्या सुमारास भव्य अशी रथयात्रा निघत असते. हजारो पद्मशाली समाजातील बांधव या रथयात्रेत सहभागी होत असतात. साधारण १२ तास ही रथयात्रा शहरातल्या विविध परिसरातून रात्री मंदिर परिसरात परतत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची ही परंपरा खंडित झाली आहे. मात्र असे असले तरी नित्योपचार सुरळीत पार पडले. आरती, होम हवन, रुद्राभिषेक इत्यादी विधी दरवरर्षी प्रमाणे ठरलेल्या वेळेत पार पडल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह काही प्रमुख मंडळीच्या उपस्थितीत विधी पार पडल्या. भाविकांना मात्र यंदा मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेऊन परतावे लागले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
दहशतवादी हल्ला देश संरक्षण

लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर ठार, दोन हल्लेखोरांचा खात्मा

श्रीनगर – बारामुल्लातील क्रिरी भागात आज सकाळी गस्तीवर असलेल्या सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलीस पथकावर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या या गोळीबारात...
Read More
post-image
देश

सरकारमुळे क्रिकेटच्या मैदानावरचं वातावरण भयंकर असेल, इम्रान खानची मोदी सरकारवर टीका

कराची – येत्या काळात भारत पाकिस्तानमध्ये क्रिकेट सामने होणार का याबाबत अनेक मतमतांतरे आहेत. त्यावर आज पाकिस्तानचे पंतप्रधान यांनी मोठं वक्तव्य केले आहे. ज्यावेळी...
Read More
post-image
महाराष्ट्र

राहुल गांधी यांचे वक्तव्य गांभीर्याने घेत नाही- देवेंद्र फडणवीस

मुंबई – फेसबुक आणि व्हाट्स अँप भाजपच्या नियंत्रणाखाली असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला होता. यावर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी...
Read More
post-image
ट्रेंडिंग मनोरंजन

मध्यमवर्गीय कुटुंबातील निशिकांत कामत यांची मराठी, तामिळ, हिंदी सिनेसृष्टीत दमदार कामगिरी

मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक निशिकांत कामत यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं आहे. वयाच्या ५० वर्षीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र, त्यांनी त्यांच्या संपूर्ण हयातीत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यातून आज दिलासादायक आकडेवारी, बरे झालेल्या रुग्णांचीही संख्या अधिक

मुंब –  राज्यात आज कोरोनाच्या नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून ११ हजार ३९१ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ८४९३ नवीन रुग्णांचे...
Read More