सोलापुराच्या कॉलेज ऑफ फार्मसीचा शनिवारी रौप्यमहोत्सव सोहळा – eNavakal
महाराष्ट्र

सोलापुराच्या कॉलेज ऑफ फार्मसीचा शनिवारी रौप्यमहोत्सव सोहळा

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचालित, कॉलेज ऑफ फार्मसी, सोलापूर हे औषधनिर्माणशास्त्र क्षेत्रातील नामांकित महाविद्यालय 2017-18 या शैक्षणिक वर्षात रौप्यमहोत्सवी वर्षात पाऊल ठेवत आहे.
यानिमित्ताने या रौप्यमहोत्सवी वर्ष सोहळ्याचा उदघाटन समारंभ शनिवार 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन.एन. मालदार यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमास पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रमुख उपस्थिती
राहणार आहे.
यावेळी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, महापौर शोभा बनशेट्टी, महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिलचे अध्यक्ष विजय पाटील तसेच सिद्धेश्वर बँकेचे अध्यक्ष प्रकाश वाले उपस्थित राहणार आहेत. यावेळी विद्यार्थी मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे, असेही शिवदारे आणि प्राचार्य आर.वाय, पाटील यांनी सांगितले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
निवडणूक महाराष्ट्र

राज्यात सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५० टक्के मतदान

मुंबई – राज्यातील विधानसभेच्या २८८ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी ७ वाजता मतदानास सुरुवात झाली असून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

चंद्रकांत पाटलांची कोथरुड-कोल्हापुरात ये-जा

कोल्हापूर – भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरुडचे उमेदवार चंद्रकात पाटलांनी आज कोथरुड आणि कोल्हापूरमध्ये ये-जा केली. सकाळी त्यांनी आपल्या मतदारसंघाचा आढावा घेतला आणि दिवसभर तिथेच थांबले....
Read More
post-image
मनोरंजन

माध्यमांची गर्दी पाहून जया बच्चन संतापल्या

मुंबई – बॉलिवूडचे शहेनशहा अभिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांच्या पत्नी अभिनेत्री व खासदार जया बच्चन यांना प्रसिद्धी माध्यमांनी गराडा घालताच त्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

आरेतील मेट्रो कारशेडला स्थगिती नाही

नवी दिल्ली – आरेतील वृक्षतोडीवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने वृक्षतोडीवरील स्थगिती कायम ठेवली असून आरेतील किती झाडे तोडली आणि त्याबदल्यात...
Read More
post-image
महाराष्ट्र

गडचिरोलीत कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया पूर्ण

गडचिरोली – १३ व्या राज्य विधानसभेसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. गडचिरोली जिल्ह्यातही आज सकाळी ७ वाजल्यापासून कडेकोट बंदोबस्तात मतदान सुरू झाले...
Read More