सोन्याचा दरवाजा लावलेले सबरीमाला मंदिर उघडले – eNavakal
News देश

सोन्याचा दरवाजा लावलेले सबरीमाला मंदिर उघडले

तिरुअनंतपुरम – केरळमधील बहुचर्चित असलेले सबरीमाला मंदिर आज सोन्याच्या दरवाजासह उघडण्यात आले. आजपासून 10 दिवसासाठी म्हणजे 21 मार्चपर्यंत हे मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. या मंदिराला प्रथमच खास सोन्याचा दरवाजा लावण्यात आला आहे. प्रसिद्ध तेलगू अभिनेता जयराम याच्या विशेष उपस्थितीत हा दरवाजा उघडण्यात आला. हा सोन्याचा दरवाजा 4 किलोच्या सोन्याने मढवलेला आहे. त्रावणकोर देवस्थान बोडार्र्चे अध्यक्ष ए. पद्मकुमार यांनी सांगितले की, हा नवीन सोन्याचा दरवाजा डिझाईनमध्ये बनवलेला आहे. आपत्कालीन परिस्थितीवेळी या दरवाजाच्या सोन्याच्या प्लेट काढून ठेवता येतात. मंदिराचे मुख्य पुजारी कंडारू राजू वारू यांनी आज पहाटे पुजा-अर्चा केल्यानंतर हा दरवाजा भाविकांसाठी 21 मार्चपर्यंत खुला करण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

एलआयसीमध्ये मेगा भरती; ८ हजाराहून अधिक जागा भरणार

मुंबई – भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) ‘असिस्टंट क्लार्क’ (सहायक) या पदासाठी मेगा भरती मोहीम जाहीर केली आहे. या भरतीच्या माध्यमातून एलआयसीच्या देशभरातील विविध कार्यालयांमध्ये मिळून...
Read More