सोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांचा उद्या सत्कार – eNavakal
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सोनम वांगचुक, डॉ. भरत वाटवानी यांचा उद्या सत्कार

मुंबई – रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०१८ चे विजेते शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. भरत वाटवानी यांचा सन्मान सोहळा उद्या आयोजित करण्यात आला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीने हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. सह्याद्री अतिथीगृहमध्ये दुपारी अडीच वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आशियातील नोबल पुरस्कार समजला जाणारा रेमन मॅग्सेस पुरस्कार यंदा दोन भारतीयांना जाहीर झाला आहे. ‘थ्री इडियट’ या सिनेमात आमिर खानने साकारलेल्या रँचोच्या भूमिकेमुळे जगभरात लोकप्रिय झालेले प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक आणि डॉ. भरत वाटवाणी यांना २०१८ साठीचा रेमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. भरत वाटवाणी यांनी भारतातील हजारो मनोरुग्ण मुलांना मानसिक आधार दिला आहे. या मुलांना त्यांनी नवं जीवदान दिल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. तर निसर्ग, संस्कृती आणि शिक्षण या क्षेत्रात भरीव योगदान दिल्याबद्दल सोनम वांगचुक यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी लडाखमधल्या दुर्गम भागात भरीव योगदान दिलं आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत मॅगेसेसे पुरस्कार विजेत्यांचा सत्कार होणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

गोविंदाच्या ‘रंगीला राजा’चा ट्रेलर पाहिलात?

मुंबई – अभिनेता गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रंगीला राजा ही दोन भावांची गोष्ट...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

मॅच फिक्सिंगप्रकरणी ‘या’ पाकिस्तानी क्रिकेटरची कबुली

लाहोर – पाकिस्तानी डावखुरा गोलंदाज दानिश कनेरियाने मॅच फिक्सिंगचे आरोप स्विकारले आहेत. मॅच फिक्सिंग प्रकरणात त्याचा सहखेळाडू मर्वेन वेस्टफील्डला तुरुंगवास भोगाावा लागला. कनेरियाने तब्बल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

तब्बल ५० कोटी मोबाईल नंबर बंद होणार?

नवी दिल्ली – देशातील जवळपास ५० कोटी मोबाईलधारकांचे सिम ‘डिस्कनेक्ट’ होण्याची शक्यता आहे. खासगी कंपन्या मोबाइल सिम कार्ड पडताळणीसाठी आधारचा वापर करू शकत नाहीत, असा निर्णय...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

…अन्यथा दिल्लीत पेट्रोल पंप बंद राहणार

नवी दिल्ली – पेट्रोल-डीझेलच्या व्हॅटमध्ये कपात न केल्यास दिल्लीतील पेट्रोल पंप संचालकांनी २२ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. या आंदोलनात दिल्लीतील चारशेहून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

शबरीमाला मंदिराचा वाद चिघळला; जमावबंदी लागू

तिरुअनंतपूरम – केरळमधील प्रसिध्द शबरीमला मंदिरात कालपासून सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्यात येणार हेता, पण तेथील काही धार्मिक संघटनांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला कडाडुन विरोध...
Read More