सेवाग्राममध्ये सर्वात मोठा चरखा पाहायला मिळणार – eNavakal
News देश

सेवाग्राममध्ये सर्वात मोठा चरखा पाहायला मिळणार

वर्धा –  सेवाग्राम येथे उभारण्यात आलेल्या नव्या सभागृहासमोर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 सुवर्ण जयंती वर्षांरंभ महोत्सवात जगातील सर्वात मोठा चरखा लोकांना पाहायला मिळणार आहे. सेवाग्राम विकास आराखड्यात सेवाग्राम वर्धा मार्गावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या जागेवर सभागृहाचे काम जलदगतीने सुरू आहे. 2019 मध्ये 150 वी जयंती आहे. त्यामुळे गांधीजांना सुवर्ण जयंती साजरी करण्यात येणार आहे.

सभागृहाच्या दर्शनी भागावर हा चरखा बसविण्यात आला असून तो जनतेला गांधी जयंतीला पाहायला मिळणार आहे. हा चरखा मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट महाविद्यालयातील प्रा.श्रीकांत खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेला आहे. ते धातू काम विभागात कार्यरत असून या कामात त्यांना रंग आणि रेखा काम विभागाचे प्रा. विजय सपकाळ व प्रा. विजय बोंदर यासह बारा विधार्थ्यांनी सहकार्य केले. प्रा. श्रीकांत खैरनार यांनी सांगितले की, शासनाने चरख्याच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली. मोठा चरखा बनवायचा हा विचार होता. दिल्लीच्या विमानतळावरील चरख्यापेक्षा मोठा असावा ही कल्पना मनात ठेवून काम सुरू केले. हा चरखा एम.एस. मध्ये बनविला. त्यामुळे दीर्घ काळ टिकणार आहे. हा 18.6 फूट उंचीचा असून त्याचे वजन 5 टन आहे. चरखा मोटरने सतत फिरत राहणार आहे. फक्त यात सूत कताई होणार नाही. एलए.डी. लाईटचा परिणाम साधला असून संगीत आणि भजन पण सुरू राहणार आहेत. हा चरखा बनवण्यासाठी वीस दिवसांचा कालावधी लागला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वत्तविहार : मराठीचा न्यूनगंड कायम

महाराष्ट्र सरकारला आपल्याच मातृभाषेचे महत्त्व समजत नसेल तर या सरकारच्या बुध्दीची जेवढी कीव करावी तेवढी थोडीच आहे. विशेषतः शिक्षण विभागाने मराठीबाबत जो काही खेळखंडोबा...
Read More
post-image
देश

भारतीय रेल्वेचे खासगीकरण होणार! सुरुवात ‘आयआरसीटीसी’पासून

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या पाच ‘रेल्वे सेवांपैकी’ एक आहे. मोदी सरकारने भारतीय रेल्वेचे आता खाजगीकरण करायचे ठरविले आहे. कमी गर्दीच्या आणि...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

नाणार प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार! मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई – नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प रायगडमध्ये स्थलांतरित होणार असून या प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरु आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबाग, रोहा, श्रीवर्धन, मुरुडसह 40 गावांमधील ग्रामस्थांचा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

सावजी हॉटेलना मिळणार दारूचा परवाना

नागपूर – नागपूर येथील प्रसिद्ध सावजी हॉटेलांमध्ये व धाब्यांवर दारू विकण्यास उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिली आहे. यामुळे आता नागपुरात कायदेशीरपणे मद्यविक्री केली जाईल....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

पवईत हॉटेलला आग; अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी

मुंबई – पवईतील हिरानंदानी परिसरात हॉटेलला भीषण आग लागली असून अग्निशमन दलाचा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. देव कोरडकर असे या कर्मचाऱ्याचे नाव असून...
Read More