सेल्फीच्या नादात तोल जाऊन पर्यटक 400 फूट दरीत कोसळला – eNavakal
News महाराष्ट्र

सेल्फीच्या नादात तोल जाऊन पर्यटक 400 फूट दरीत कोसळला

माथेरान – माथेरानला फिरायला गेल्यानंतर सेल्फी काढण्याच्या नादात एक पर्यटक चक्क 400 फूट खोल दरीत कोसळला होता. परंतु, दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. दरीत पडल्यानंतर त्याला स्थानिक बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढले असून, तो किरकोळ जखमी झाला आहे. अजित प्रभाकर बर्वे (58) असे त्याचे नाव आहे. तो मुंबईतील विलेपार्ले या ठिकाणी राहतो. दोन दिवसापूर्वी तो माथेरानला फिरण्यासाठी गेला होता. तो त्या ठिकाणी एका हॉटेलमध्ये राहत होता. बुधवारी ते सकाळी साडे नऊच्या सुमारास सेल्फी पॉइंट (एको पॉइंट) वर फिरण्यासाठी गेला होता. सुरक्षा कठडे ओलांडून दरी पाहत असताना तसेच मोबाइलवर सेल्फी काढत असताना त्यांचा तोल गेला व ते खाली कोसळले. हिरवे गवत ओले असल्याने अचानक त्यांचा पाय घसरला.
त्यानंतर ‘वाचवा वाचवा’ असे ओरडू लागले. हा प्रकार पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांना रेस्क्यू टीमच्या साहाय्याने सुखरूप बाहेर काढले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
देश

कमलेश तिवारी हत्येप्रकरणी बिजनोरमधून मौलानाला अटक

लखनऊ – हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी बिजनोरमधून मौलाना अनवारुल हकला ताब्यात घेतले आहे. तर दुसरीकडे गुजरात एटीएसने या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

पावसामुळे अजित पवारांचा हडपसरमधील रोड शो रद्द

पुणे – आज सायंकाळी विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे आजच्या दिवसात शक्तीप्रदर्शन करण्यासाठी सर्वच पक्ष सज्ज आहेत. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या...
Read More
post-image
मुंबई

रिलायन्स समूहाच्या नफ्यात १८ टक्क्यांची वाढ

मुंबई – देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समूहाने सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत विक्रमी नफ्याची नोंद केली आहे. वार्षिक तुलनेत त्यांच्या नफ्यात १८.६...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

नागपुरात रोड शो काढून मुख्यमंत्र्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नागपूर – विधानसभा निवडणूक प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून प्रचार सभा, फेऱ्या अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र...
Read More
post-image
महाराष्ट्र

तुरुंगात असलेले रमेश कदम ठाण्यातील घरात; ५३ लाखांची रोकड जप्त

ठाणे – राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना ठाण्यातील घोडबंदर येथील एका खासगी फ्लॅटमध्ये ५३ लाख ४६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली...
Read More