सेलू बाजार समितीच्या संचालकाचे दुकान पालिकेकडून उद्ध्वस्त – eNavakal
महाराष्ट्र

सेलू बाजार समितीच्या संचालकाचे दुकान पालिकेकडून उद्ध्वस्त

परभणी – सेलू येथील मोंढा परिसरात मनियार कॉम्प्लेक्स समोर नव्याने अतिक्रमण झालेल्या दुकाना पैकी बाजार समितीचे संचालक अशोकराव गजमल यांनी टिन शेड उभारून दुकान तयार केलेल्या बांधकामाची चर्चा होत असतानाच  शुक्रवारी पहाटे पालिकेच्या पथकांनी सकाळी सहा ते सात वाजता येऊन नव्याने तयार करण्यात आलेल्या बाजार समितीचे संचालक अशोक गजमल यांची अतिक्रमित टिनशेड उध्वस्त करण्यात आले. या मुळे मोंढा परिसरात एकच खळबळ उडाली असून इतरांनी केलेले अतिक्रमण नगरपालिका अशीच पडनार की तडजोड करणार  याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे .

जनशक्ती विकास आघाडी च्या नगराध्यक्ष विनोद बोराडे यांच्या ताब्यात आहे. तर कृषी उत्पन्न बाजार समिती ही माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या समर्थक रवींद्र डासाळकर यांच्या ताब्यात आहे. सत्तेत आल्यानंतर उभयतांंनी  विकास कामाचा  धडाका लावला आहे. परंतु एकमेकांच्या परवान्यामुळे बाजार समितीचे काही कामे पालिकेच्या संमती मुळे आडून पडले आहे.

मोंढ्यात  मालमत्तेवर बाजार समितीच्या अधिकार असला तरी बांधकाम व अतिक्रमण हाटविण्याचा अधिकार नगरपरिषदेला आहे. म्हणूनच तर एक दिड लाख रुपये खर्च करून बाजार समितीच्या संचालकांने  मोंढा परिसरात टिनशेड उभे करून एक दुकान थाटले होते .यापूर्वी विनापरवाना अथवा अतिक्रमन  असलेल्यांची संख्या मोठी आहे .परंतु त्याकडे नगरपालिका व बाजार समिती सौजन्य दाखविते. मात्र बाजार समितीचे संचालक असलेल्या अशोकराव गजमल यांना उभयतांची मर्जी सांभाळता आली नाही. म्हणून थेट पालिकेने कोणाची तक्रार नसताना ही मोहीम राबवित बाजार समितीत बोर्डीकर यांची सत्ता असलेल्या सभापती डासाळकर यांना  दणका दिला. आणि शुक्रवारी दि. 10 ऑगस्ट रोजी पालिकेच्या पथकाने हे टिनशेड चे दुकान पाडले .या घटनेनंतर मोंढ्यासह शहरात एकच  खळबळ उडाली. असून नगरपालिकेकडे तर शहरातील अतिक्रमित बांधकाम पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. त्यांच्या अतिक्रमणाचे काय असा प्रश्न लोक उपस्थित करत आहेत . पहिल्यांदा पालिकेने थेट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांनाच दनका दिल्या मुळे इतरांनी मात्र यांची धास्ती घेतली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र

चार मराठी चित्रपटांची महिनाभरात 50 ते 60 कोटींची कमाई

मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीला यशाचे प्रभावी टॉनिक मिळाले आहे. …आणि डॉ. काशिनाथ घाणेकर, नाळ, मुळशी पॅटर्न आणि मुंबई-पुणे-मुंबई 3 या चारही चित्रपटांनी यशाचा चौकार मारला....
Read More
post-image
News मुंबई

पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदतवाढ

मुंबई,- राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना सेवत देण्यात आलेल्या मुदतवाढीचे राज्य सरकारने आज समर्थन केले. त्यांना दिलेली मुदतवाढ ही राज्य आणि केंद्र सरकारने...
Read More
post-image
क्रीडा

बेलेच्या गोलामुळे माद्रिदचा विजय

माद्रिद – स्पॅनिश साखळी फुटबॉल स्पर्धेत बलाढ्य रियल माद्रिदने बेलेने नोंदवलेल्या एकमेव गोलांच्या जोरावर शानदार विजय मिळवला. माद्रिदने आपल्या साखळी लढतीत तळाला असलेल्या ह्यूसेका...
Read More
post-image
Uncategoriz

मुंबई विमानतळावरून 24 तासांत तब्बल 1004 विमाने ये-जा झाली

मुंबई – सर्वाधिक वर्दळ असलेला विमानतळ म्हणजे मुंबई विमानतळ. स्वतःचाच विक्रम मुंबई विमानतळाने पुन्हा एकदा मोडीत काढला, 8 डिसेंबरला 24 तासात मुंबई विमानतळावर 1004...
Read More
post-image
News देश

आरबीआयच्या निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती

नवी दिल्ली- उर्जित पटेल आरबीआयला वाचवण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आपली कातडी वाचवण्यासाठी आरबीआयच्या राखीव निधीचा वापर करणे ही देशविरोधी कृती असल्याचे...
Read More