सेलूत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी धुडकावले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  – eNavakal
महाराष्ट्र

सेलूत महसूलच्या कर्मचाऱ्यांनी धुडकावले जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

परभणी – परभणीचे जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील तहसील कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश 31 मे रोजी काढले होते. मात्र त्या आदेशाची  अंमलबजावणी अद्यापही झालेली नसून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला कर्मचारी तसेच तसीलदार यांनी धुडकावले असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.

परभणीचे जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयातील लिपिकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश 31 मे 2018 रोजी काढले होते. तसेच तात्काळ बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याचे आदेश ही त्याच आदेशात देण्यात आले होते. मात्र अडीच महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरीही  एकही कर्मचारी बदली झालेल्या ठिकाणी रुजू झालेला नाही. तसेच जिल्हाधिकारी यांनी 2017 मध्ये एका कर्मचाऱ्याला तीन वर्षांपेक्षा जास्त एका टेबलवर अथवा खात्यावर ठेवण्यात येऊ नये अशी ही लेखी आदेश दिले होते. मात्र त्या आदेशालाही संबंधित तहसीलचे तहसीलदार  आणि कर्मचाऱ्यांनीही जिल्हाधिकारी यांच्या या  आदेशाला देखील धुडकावले आहे.

सेलू तहसील कार्यालयात तर  पाच वर्षापासून त्याच कर्मचाऱ्याकडे एकाच खात्याचा कार्यभार देण्यात आलेला आहे. यापैकी काही कर्मचारी तर  लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत अडकलेले आहेत. तरीही त्यांच्याकडे  अकाउंट आणि रोखपाल सारख्या महत्त्वाच्या पदावर ठेवण्यात आले आहे. ही मनमानी संबंधित कर्मचारी करतोय की त्याची पाठराखण तहसीलदार करतात हे महसूल विभागाचे  कोडे  मात्र  उलगडत नाही. तसेच सेलू येथील उपजिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागांतर्गत एकाच जागेवर ठाण मांडून बसलेले तलाठी यांच्याही बदल्या 30 मे 2018 रोजी केलेल्या होत्या  त्या बदल्यांना देखील अद्यापपर्यंत मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे या बदली प्रकरणाचे  काय झाले. याबाबत आता जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून कार्यवाही करावी. अशी जनतेतून मागणी होतआहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ न्यायालय महाराष्ट्र

‘माझ्या जीवाला धोका’! अजामिनपात्र वॉरंटविरोधात मेहुल चोक्सी हायकोर्टात

मुंबई- पंजाब नॅशनल बँकेत झालेल्या 12 हजार 700 कोटी रूपयांच्या घोटाळ्याप्रकरणी आरोप असलेले हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनी न्यायालयाने जारी केलेल्या...
Read More
post-image
महाराष्ट्र शेती

पावसाने दडी मारल्याने भातशेती संकटांत

वाडा – पालघर जिल्ह्यात पावसाने गेल्या पंधरा दिवसांपासून दडी मारल्याने व कडक उन्हामुळे भातशेती संकटांत आली आहे.भात तयार होण्याच्या ऐन मोसमात पावसाने दडी मारल्याने शेतकरी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

#AsiaCup2018 बांगलादेशची तिसरी विकेट; शाकीब-अल-हसन बाद

दुबई – एशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील दुसर्‍या टप्प्याला आजपासून प्रारंभ होत असून, सुपर फोरमध्ये पुन्हा एकदा भारत, पाकिस्तान, बांगला देश आणि आफगाणिस्तान यांच्यात लढती...
Read More
post-image
महाराष्ट्र

दडी मारलेल्या पावसाची राजापूरमध्ये दमदार हजेरी

रत्नागिरी – गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने दडी मारलेली आहे. काही तुरळक सरींचा अपवाद वगळता पावसाने तशी पाठच फिरवली होती. त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. पण...
Read More
post-image
महाराष्ट्र

नदीतील तरंगता कचरा काढण्यासाठी ‘फ्लोटर वॉटर ड्रोन’चा वापर

पिंपरी – शहरातील पवना, इंद्रायणी व मुळा नदीपात्रातील तरंगता कचरा स्वच्छ करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने ‘फ्लाटिंग वॉटर ड्रोन’ची मदत घेतली आहे. गणेशोत्सवात प्रायोगित तत्त्वावर पवना...
Read More