सेलूत नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले – eNavakal
News महाराष्ट्र

सेलूत नगरपालिकेने आठवडी बाजारातील दोन दुकानाचे अतिक्रमण हटवले

परभणी- सेलू शहरातील वाढते अतिक्रमण नगर परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे दिवसेंदिवस वाढत असेचं बेकायदेशीर ठरलेले आठवडी बाजार येथील अतिक्रमण गुरुवार 11 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11-30 वाजता नगर पालिकेच्या पथकाने पोलीस संरक्षणात काढले आहे.

यापूर्वी नगरपालिकेच्या पथकाने बाजार समितीच्या एका संचालकाने मोंढ्यात केलेले अतिक्रमण काढले होते. शहरात जवाहररोड, श्रीकेशवराज बाबासाहेब रोड, स्टेशन ते रायगड कॉर्नर नुतन विद्यालय रोड या मुख्य वर्दळीच्या ठिकाणी असलेले अतिक्रमण मात्र राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केल्यामुळे ते हटविण्यास नगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग सतत चालढकल करत आहे.यामुळेच शहरातील अतिक्रमणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

आठवडी बाजार मध्ये विष्णू चव्हाण व राजू चव्हाण यांचे लोखंडी अंगल चे अतिक्रमण रस्त्यावर येत असल्यामुळे त्यांना वेळोवेळी सूचना देऊनही त्यांनी अतिक्रमण काढले नाही. तेव्हा नगरपालिकेच्या मुख्याधिकारी देविदास जाधव यांनी पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढले अशी माहिती स्वच्छता विभाग प्रमुख सुदाम राठोड यांनी यावेळी दिली. नगरपालिकेने अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा करून दिला. इतर ठिकाणी असलेल्या अतिक्रमणाला अशीच सवड काढून अतिक्रमण हटविले तर शहरातील सर्वच रस्ते मोकळा स्वास घेतील आणि पादचारी व वाहन धारकांना धड चालता फिरता येईल.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

इलेक्ट्रिक बस करार रद्द! बेस्टला हायकोर्टाचा दणका

मुंबई- प्रदुषणावर आळा घालण्यासाठी 40 इलेक्ट्रिक बस पुरविण्याचा एका कंपनीशी केलेला करार एकतर्फी रद्द करण्यार्‍या बेस्ट प्रशासनाला उच्च न्यायालयाने आज चांगलाच दणका दिला. कायद्याचे उल्लंघन...
Read More
post-image
News मुंबई

‘मीटू’ मोहिमेबाबत हायकोर्टात याचिका

मुंबई- संपूर्ण देशभरात सुरू असलेल्या ‘मीटू’ या मोहिमेबाबत आज हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. वकील सन्नी पुनामिया यांनी ही याचिका दाखल केली आहे....
Read More
post-image
News देश

एम. जे. अकबरांवर आणखीन एक आरोप! महिला पत्रकाराने लेखाच्या माध्यमातून केले उघड

नवी दिल्ली-  लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांच्याविरोधात आणखीन एका महिला पत्रकाराने आरोप केला आहे. अकबर यांनी आपल्याला अनेकवेळा...
Read More
post-image
News मुंबई

नरेंद्र मोदींच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी 2 कोटींची उधळण

मुंबई- राज्यात एकीकडे तिजोरीत खडखडाट असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिर्डीतील कार्यक्रमाला गर्दी जमविण्यासाठी राज्य सरकार तब्बल दोन कोटी रुपयांची उधळण करणार असल्याची धक्कादायक माहिती...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी दोन दिवस मध्य प्रदेश दौर्‍यावर

ग्वाल्हेर- राहुल गांधी दोन दिवसांच्या मध्य प्रदेश दौर्‍यावर आहेत. आज, ग्वाल्हेर येथील किला भागात असलेल्या गुरुद्वाराला भेट देऊन त्यांनी माथा टेकला. यावेळी राहुलबरोबर ज्योतिरादित्य सिंधिया,...
Read More