सेलूत गुत्तेदारांना मालामाल करणारे रस्त्यावरील खड्डे – eNavakal
News महाराष्ट्र

सेलूत गुत्तेदारांना मालामाल करणारे रस्त्यावरील खड्डे

परभणी – संपूर्ण तालुक्यात सेलू – देवगाव फाटा हा 20 किमी अंतराचा रस्ता सोडला  तर तालुक्यातून ग्रामीण भागात व शहराकडे जाणाऱ्या सर्वच रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत.  पावसाळा एकदा संपला की दरवर्षी खड्ड्यांची आठवण प्रकर्षाने होत असते. तशीच आठवण खड्डे हे गुत्तेदारांना मालामाल करण्यासाठी पडतात का याची देखील होते.

सेलू- पाथरी व सेलू- मानवत रोड  सेलू- परतुर या शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावरील खड्डे फार धक्के देतात. या रस्त्यावरील खड्ड्यांचा आकार लक्षात घेतल्यावर सहजच केंद्रीय मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. ज्या रस्त्यावर चकाचक रोड करणाऱ्या गडकरी यांच्याच देशात आपण राहत आहोत का असाही प्रश्न सत्तवीत असतो. एकीकडे केंद्रीय मंत्री गडकरी यांचे नजर लागणारे रस्ते आणि दुसरीकडे दरवर्षी गुत्तेदारांना मालामाल करणारे रस्त्यावरील खड्डे हा विरोधाभास तालुक्यातील जनतेच्या मनातील दूर करून खड्डेमुक्त रस्ता करून प्रतीक्षा एकदाची संपवावी आणि खड्डे बुजण्याच्या नावाखाली मालामाल होणाऱ्या गुत्तेदारांची होणारी चंगळ थांबवावी अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितिन गडकरी तसेच राज्य सरकार यांच्याकडून केली पाहिजे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

ठग्स ऑफ हिंदुस्तानचे ‘वाश्मल्ले’ गाणे पाहिले का?

मुंबई – बिग बी अमिताभ बच्चन आणि मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खान’ हे दोघे पहिल्यांदाच ‘ठग्स ऑफ हिंदुस्तान’ या चित्रपटाच्या माध्यमातून सोबत काम करत आहेत....
Read More
post-image
Uncategoriz

दिवाळीत साखर स्वस्त होणार

मुंबई – दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळ निघत अशी आरडाओरड करणाऱ्या रेशनकार्ड धारकांना सरकारने मोठा दिलासा दिला आहे. साखर आणि डाळीच्या दरात घट करण्यात आली असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात वाढ

दिल्ली – केंद्र सरकारने ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अन्य योजनांवरील व्याजदरात ०.४ टक्के इतकी वाढ केली आहे. यामुळे व्याजदर...
Read More
post-image
न्युज बुलेटिन व्हिडीओ

नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन (१६-१०-२०१८)

Sharing is caring!FacebookPinterestTwitterGoogle+ Related posts: ई नवाकाळ’चे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे न्यूज बुलेटिन ई नवाकाळचे सायंकाळी ७ वाजताचे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

मुख्यमंत्री फडणवीस – रविंद्र वायकर यांच्यात संघर्ष पेटला

मुंबई –  आरे येथे असलेल्या आदिवासी पाड्यातील जवळपास २ हजार आदीवासींसाठी एसआरएची घरे उपलब्ध करून देत ही घरे किमान ४८० चौरस फुटाचे देण्याची घोषणा...
Read More