सेना-भाजपाच्या जागा वाटपाचे गूढ कायम – eNavakal
News महाराष्ट्र

सेना-भाजपाच्या जागा वाटपाचे गूढ कायम

मुंबई – भाजपा आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाचा तिढा अद्याप सुटण्याची लक्षणे नाहीत. त्यामुळे शिवसेनेचा संयम सुटत चालला आहे. आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्विग्नपणे सांगितले की,‘आता मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी बनवून माझ्याकडे द्यावी.’
आज मातोश्रीवर भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना शिवसेना-भाजपाच्या जागा वाटपाच्या तिढ्याबद्दल प्रश्न विचारले. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, माझा आणि अमित शहा यांचा जागा वाटपाचा फार्म्युला ठरला आहे. परंतु अद्याप निर्णय झालेला नाही. तेव्हा मुख्यमंत्र्यांनीच शिवसेनेच्या उमेदवारांची यादी बनवून माझ्या हातात द्यावी.
शिवसेना 135 जागा मिळाव्यात या मागणीवर ठाम आहेत. मात्र भाजपा शिवसेनेला फक्त 105 जागा देऊन स्वतः 165 जागा लढवू पाहत आहेत. मित्र पक्षांना 18 जागा सोडण्याची या दोघांचीही तयारी आहे. मात्र 105 जागा शिवसेनेला मान्य नाहीत. त्यामुळे जागा वाटपाचा तिढा लांबत चालला आहे. त्यामुळे भाजपाला शिवसेनेबरोबर युती करायची आहे की नाही, असा संशय येऊ लागला आहे.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More
post-image
News निवडणूक महाराष्ट्र

विधानसभेसाठी ‘आप’ची 8 जागांची पहिली यादी जाहीर

मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता आम आदमी पक्षानेही कंबर कसली आहे. आम आदमी पक्षाने आज आठ जागांसाठी पहिली यादी जाहीर केली आहे. आपचे...
Read More