सेनाभवनसमोर मनसेची शिवसेनेविरुद्ध पोस्टरबाजी – eNavakal
मुंबई

सेनाभवनसमोर मनसेची शिवसेनेविरुद्ध पोस्टरबाजी

मुंबई – गिरगावमध्ये मंडप उभारण्यासाठी गणेश मंडळांना मुंबई महापालिकेने परवानगी नाकारल्याने आता शिवसेनेला आव्हान देण्यासाठी राज ठाकरे यांची मनसे मैदानात उतरली आहे. ‘राम मंदिराआधी गणेशोत्सव मंडप बांधा’, अशी बोचरी टीका करणारे पोस्टर मनसेने शिवसेना भवनासमोर लावले आहे.

‘अयोध्येत मंदिर नक्की बांधा, पण त्याआधी मुंबईत गणपती मंडप बांधण्यासाठी परवानगी द्या’, असे या पोस्टरवर लिहिण्यात आले आहे. अलीकडेच राज ठाकरे यांनी गिरगावच्या खेतवाडीत जाऊन गणेश मंंडळांची भेट घेतली होती. त्यावेळी ‘बिनधास्त मंडप बांधा आणि गणेशोत्सव साजरा करा’ असा दिलासा गणेश मंडळांना दिला होता. पण त्यानंतरही मंडळांना परवानगी दिली नव्हती. त्यामुळे मनसेने आज पोस्टरबाजीतून शिवसेनेवर हल्लाबोल केला. कारण काही दिवसांपूर्वी याच परिसरात ‘चलो अयोध्या, चलो वाराणसी’चे आवाहन करणारे पोस्टर शिवसेनेने लावले होते. यावर मनसेने निशाणा साधला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत गणेशोत्सव आवडत नसेल तर त्यांनी खुशाल स्मशानात जावे, असे विधान केले आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी आपण आयोध्येमध्ये राममंदिर उभारण्यासंदर्भात जाणार आहोत, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर ‘चलो अयोध्या’ असे पोस्टर सेना भवनासमोर लागले होते. त्याच ठिकाणी मनसेने आपले पोस्टर लावले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

गूगलवर ‘इडियट’ सर्च कराल तर दिसतील ‘ट्रम्प’

वॉशिंग्टन – गूगलने इडियट सर्च केल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा फोटो येत असल्याने अमेरिकेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. याबाबत गूगलचे सीईओ सुंदर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

बिग बींच्या प्रतीक्षा बंगल्याची ‘दीवार’ धोक्यात

मुंबई – मुंबईतील जुहू येथील संत ज्ञानेश्वर मार्गाचे 6० फूट रुंदीकरण होणार आहे. त्यामुळे या मार्गावर असणाऱ्या बिग बी अमिताभ यांच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्याचा काही...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा निवडणुकीपूर्वीच जनतेपर्यंत जाऊन पोहचा – मोदी

नवी दिल्ली – कार्यकर्त्यांचे प्रचंड जाळे असूनही भारतीय जनता पक्षाचा राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांत दणदणीत पराभव झाल्यामुळे भाजपा हादरला आहे. आज...
Read More
post-image
महाराष्ट्र

१८ डिसेंबर रोजी नांदेड मनपा सभापती पदाची निवडणूक

नांदेड – महापालिका स्थायी समिती सभापतीची निवडणूक १८ डिसेंबर रोजी होणार असून या निवडणुकीसाठी पिठासिन अधिकारी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय आयुक्तांनी हा...
Read More
post-image
मुंबई

मुंबई मेट्रो ३ च्या दिनदर्शिकेत विद्यार्थ्यांनी रेखाटलेली चित्रे झळकणार

मुंबई – मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या २०१९ दिनदर्शिकेमध्ये काही आकर्षक चित्रे सर्वसामान्य लोकांना पाहायला मिळणार आहेत. आगामी वर्षाची दिनदर्शिका सर्वोत्तम असावी यासाठी एमएमआरसीने “मुंबई...
Read More