सूरत – गुजरातमधील सूरत येथे सोमवारी रात्री उशिरा एक भीषण अपघात झाला. सूरतमधील किम रोडवर ट्रकने एका मुलासह 22 जणांना चिरडले. त्यात 13 जण जागीच ठार झाले. तसेच या अपघातात 9 जण जखमी झाले असून त्यांना सूरतच्या एसएमआयएमआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यान जखमींपैकी 2 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला.
सूरतमधील पलोड गावाच्या जवळ असणाऱ्या किम मांडवी रस्त्यावर हा अपघात झाला. रात्री बारानंतर किम हाकर मार्गाजवळ मांडवीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रॅक्टरला ट्रकने जोरदार धडक दिल्यानंतर ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनरही गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, रात्री या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस अधिकारी आणि मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला, त्यानंतर मदतकार्य सुरु झाले.