सूतगिरणीकडील थकीत कर्जप्रकरणी धनंजय मुंडेंना दिलासा – eNavakal
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

सूतगिरणीकडील थकीत कर्जप्रकरणी धनंजय मुंडेंना दिलासा

बीड – संत जगमित्र नागा सूतगिरणीकडील थकीत कर्जामुळे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि इतर संचालकाच्या मालमत्तेवर अंबाजोगाईच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने याआघी टाच आणली होती. आज कोर्टाने या निर्णयाच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे,

अंबाजोगाई न्यायालयाचे जिल्हा व सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी 5 सप्टेंबर रोजी दिलेल्या एका निकालात संत जगमित्र सुतगिरणी संदर्भात सूतगिरणीच्या व संचालकांची अर्जात नमूद केलेली मालमत्ता विक्री करता येणार नाही, गहाण खत करता येणार नाही किंवा त्यावर बोजा चढवता येणार नाही, असे म्हटले होते. या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी याच कोर्टात अर्ज करुन या निकालास स्थगिती देण्याची विनंती केली होती. सदर कारवाई करताना काही विशिष्ट लोकांवरच कारवाई करण्यात आली, गृहमंत्रालयाकडून याबाबत घ्यावयाची परवानगी कायद्याला अभिप्रेत संज्ञेप्रमाणे न केल्यामुळे तसेच या प्रकरणी कोणतीही नोटीस न मिळाल्याने संपत्तीवर टाच आणण्याच्या निर्णयास स्थगिती देण्याची विनंती करण्यात आली होती. तसेच हा आदेश एकतर्फी असल्याचेही म्हटले होते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
महाराष्ट्र शिक्षण

अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू

मुंबई – इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. बायफोकल वगळता इतर शाखांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया २९ जूनपर्यंत सुरू राहणार असून पहिली गुणवत्ता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More