मुंबई- कालाघोडा फेस्टीवल सध्या सुरू असून आज रविवार निमित्त लोकांनी हे प्रदर्शन बघण्यासाठी प्रेक्षकांनी एकच गर्दी केली. मुंबईतल्या प्रसिद्ध काळाघोडा फेस्टिलव्हला सुरुवात झाली आहे. पर्यटन विभाग आणि पालिकेच्या मदतीने या दरवर्षी या फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येतं. या फेस्टिव्हलमध्ये विविध वस्तूंचे स्टॉल्स, टाकाऊपासून टिकाऊ आणि आकर्षक वस्तूंचे स्टॉल्स लक्षवेधी ठरतायत. या वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची गर्दी होऊ लागलीय. इथल्या विविध कलाकृती पाहण्यासाठी लहान-थोर गर्दी करतायत.
