सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.

सुशांतच्या वडिलांनी रियाविरोधात पाटण्यात एफआयआर दाखल केली होती. हेच प्रकरण मुंबईत हस्तांतरित व्हावे, अशी मागणी रियाने सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. त्यावर आज निर्णय देताना सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करेल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

यापूर्वी मंगळवारी याप्रकरणी न्यायमूर्ती हृषिकेश राय यांच्या खंडपीठाने सुनावणी घेतली होती. यावेळी बिहार सरकारचे ज्येष्ठ वकील मनिंदर सिंह, महाराष्ट्र सरकारचे वकील ए. एम. सिंघवी, रियाचे वकील श्याम दिवाण आणि सुशांत सिंहच्या कुटुंबीयांचे वकील विकास सिंह यांनी आपली बाजू मांडली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता.

दरम्यान, सुशांतच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर रिया आणि इतर काही जणांवर भारतीय दंड संविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम ३०६, ३४१, ३४२, ३८०, ४०६, ४२० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रियाने सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागत बिहार पोलिसांनी दाखल केलेली ही एफआयआर पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा मुद्दा मांडला होता. या प्रकरणाच्या तपासाबाबत सर्वोच्च न्यायालय नेमका कोणता निर्णय देणार याकडे कलाविश्वासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश न्यायालय मनोरंजन

सुशांत आत्महत्येचा तपास सीबीआय करणार

मुंबई – अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने सुशांत सिंह आत्महत्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश मनोरंजन

खिलाडी अक्षय कुमारची आसामच्या पूरग्रस्तांना १ कोटींची मदत

मुंबई – चित्रपट सृष्टीतील खिलाडी अक्षयकुमार याने आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी १ कोटींची देणगी दिली आहे. त्याच्या या मदतीबद्दल आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी अभिनेता...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना देश

२४ तासांत ६४,५३१ नवे रुग्ण! भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २७ लाख ६७ हजार २७४ वर

नवी दिल्ली – भारतात गेल्या काही दिवसांपासून दररोज ५० हजारांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. मंगळवारी दिवसभरात देशात तब्बल ६४ हजार ५३१ नव्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

माझ्यासाठी प्रार्थना करा! रुग्णालयात जाण्यापूर्वी भावुक झाला संजय

मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्त हा फुप्फुसाच्या कर्करोगावरील उपचारासाठी मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल झाला आहे. मंगळवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास तो आपल्या वांद्रे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

गणेशोत्सवावर पावसाचे संकट! राज्यात ४-५ दिवसांत मुसळधार कोसळणार

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. जुलै महिन्यात दडी मारलेल्या पावसाने ऑगस्टमध्ये मात्र जोरदार बँटिग सुरू केली. या पावसामुळे कोल्हापूरसह...
Read More