सुरत-नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी गौण खनिजाची चोरी; कंपनीचा डंपर जप्त – eNavakal
गुन्हे महाराष्ट्र

सुरत-नागपूर महामार्ग चौपदरीकरणासाठी गौण खनिजाची चोरी; कंपनीचा डंपर जप्त

धुळे- सुरत-नागपूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणार्‍या जी.एच.व्ही. कंपनी गौण खनिजाची चोरी करीत असल्याचे आरोप होत असून याला पुष्ठी देणारी कारवाई महसुल विभागाच्या पथकाने गेल्या आठवडयात केली. अवैधरित्या मुरुम वाहुन नेणारे डंपर वाहन तलाठी पथकाने पकडले.
याप्रकरणी काल 8 रोजी धुळे तालुका पोलिस ठाण्यात तलाठी विजय हिरामण बाविस्कर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, दि. 3 नोव्हेबर रोजी धुळे शहराजवळील मोराणे गावाजवळ राधेय फार्म समोर राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर महसुल विभागाच्या पथकाने 4.30 वाजेच्यासुमारास जी.एच.व्ही. कंपनीचे एमएच18/बिजे0104 या क्रमांकाचा मुरुम मातीने भरलेला डंपर ट्रक पकडला. यावेळी गाडीवरील चालकाकडे या गौण खनिजासंबंधी रॉयल्टी भरल्याची कोणतीही पावती अथवा परवानगी कागद नव्हते.
त्यामुळे पथकाने 3 लाख रुपये किंमतीचा ट्रक आणि 4 हजार रुपये किंमतीचे गौण खनिज असा एकुण 3 लाख 4 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. तसेच याप्रकरणी सदर गाडीवरील चालकाविरुध्द गुन्हा केला
गेला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश

राहुल गांधींनी लोकसभेत घेतली खासदारकीची शपथ

नवी दिल्ली – मोदी सरकार पुन्हा सत्तेवर आल्यानंतर संसदेचे पहिले अधिवेशन आज सोमवारपासून सुरू होत आहे. आज वीरेंद्र कुमार यांनी हंगामी लोकसभा अध्यक्ष म्हणून शपथ...
Read More
post-image
देश

#CycloneVayu २४ तासांत अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली – वायू चक्रीवादळाने दिशा बदलल्याने गुजरात आणि मुंबईसह कोकणावरील धोका टळला आहे. मात्र हे वादळ गुजरातच्याच दिशेने पुढे जाईल, असे हवामान खात्याने...
Read More
post-image
विदेश

वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकावरून हाँगकाँगच्या प्रमुखांनी मागितली माफी

हाँगकाँग – वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयकाला सरकारने स्थगिती दिली असतानाही काल रविवारी हाँगकाँगमध्ये लाखो नागरिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलकांनी हाँगकाँग नेत्याच्या राजीनाम्याची मागणी केली....
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या आंदोलन आरोग्य देश

ममता बॅनर्जींसोबत चर्चेसाठी डॉक्टर रवाना

मुंबई – पश्चिम बंगालमध्ये निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) आज सोमवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. त्यानुसार...
Read More
post-image
देश

एक देश, एक निवडणूक! मोदींनी बोलावली बुधवारी बैठक

नवी दिल्ली – प्रचंड बहुमत व देशाच्या सत्तेवर पूर्णपणे पकड निर्माण झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणखी एक हादरवणारा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. ‘एक...
Read More