सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर – eNavakal
दिनविशेष लेख

सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर

सुरेश वाडकर यांचा जन्म ७ ऑगस्ट १९५४ रोजी झाला. सुरेश वाडकर यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली, तसेच ‘पतियाळा’ घराण्याची तालीम घेतली. त्यांनी पाश्र्वनाथ डिग्रजकर यांच्याकडून ही प्राथमिक गायनाचे शिक्षण व सदाशिव पवार यांच्याकडून तबल्याचे प्राथमिक शिक्षण घेतले. १९७६ साली सूर-सिंगार नावाच्या संगीत स्पर्धेत सुरेश वाडकरांनी भाग घेतला. त्या मधील स्पर्धकांची कामगिरी पारखायला हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार जयदेव इत्यादी नामवंत परीक्षक होते. सुरेश वाडकर या स्पर्धेत विजेते ठरले. १९७६ नंतर सुरेश वाडकर यांनी चित्रपटांमध्ये गायला सुरुवात केली होती. त्यानंतर जयदेवांनी चाली बांधलेल्या गमन या हिंदी चित्रपटातील सीनेमें जलन हे गाणे वाडकर यांना गायला मिळाले.

‘मेघा रे मेघा रे’, ‘चप्पा चप्पा चरखा चले’, ‘ए जिंदगी’ यांसारख्या अनेक सुपरहिट गाण्यांमुळे सुरेश वाडकरांनी चाहत्यांच्या मनावर त्यांच्या आवाजाची छाप सोडली आहे.  प्रेमरोग, सदमा या चित्रपटातील त्यांची गाणी खूपच गाजली. मा. सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने मराठी व अनेक हिंदी चित्रपटांमधून पार्श्वगायन केले आहे. याखेरीज त्यांनी काही भोजपुरी, कोकणी, मल्याळी, गुजराती, बंगाली, सिंधी चित्रपटांतूनही आणि उर्दू भाषेतूनही गाणी गायली आहेत. हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची परंपरा टिकावी यासाठी सुरेश वाडकर यांनी आजीवासन गुरुकुलम नावाची संस्था सुरू केली. संगीत स्पर्धांमध्ये सुरेश वाडकर अनेकदा परीक्षक असतात. सुरेश वाडकर यांना त्यांच्या संगीतसेवेसाठी सुमारे ११ पुरस्कार मिळाले आहेत.

संजीव वेलणकर, पुणे
email – sanvelankar@gamil.com

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
लेख

वृत्तविहार : रजनीकांत यांचे धक्कातंत्र

राजकारणाची दक्षिण शैली ही सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. इथले राजकारण हे इतक्या चित्रविचित्र पध्दतीने चालू असते. की त्याचा अंदाजही बांधता येत नाही. अण्णा...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक

सिमांतिनी कोकाटे यांच्यावर हकालपट्टीची टागंती तलवार

नाशिक – बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढविणाऱ्या माणिकराव कोकाटे यांची पक्षातून हकालपट्टी केल्यानंतर आता सर्वाचेच लक्ष सिमांतिनी माणिकराव कोकाटे यांच्यावरील कारवाईकडे लागले आहे. सिमांतिनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश निवडणूक

सत्ता आणि पैशासाठी शिवसेना-भाजप एकत्र – राज ठाकरे

रायगड – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मोदी विरोधी भुमिका घेतली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील शेवटची सभा आज रायगड...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

करकरेंबद्दल विधान, भाजपने केले हात वर

नवी दिल्ली –  प्रज्ञा सिंह यांनी हेमंत करकरेंबद्दल धक्कादायक वक्तव्य केले आहे. ‘हेमंत करकरें यांना दहशतवाद्यांनी मारून माझं सूतक संपवलं’ असे वादग्रस्त वक्तव्य साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या, शवविच्छेदन अहवालामधून झाले उघड

नवी दिल्ली – उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री एन. डी. तिवारी यांचे पुत्र रोहित शेखर यांची तोंड दाबून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन...
Read More