‘सुपर मॉम’ मेरी कोमने रचला नवा इतिहास – eNavakal
News आघाडीच्या बातम्या क्रीडा विदेश

‘सुपर मॉम’ मेरी कोमने रचला नवा इतिहास

उलान उदे, रशिया – भारताची महान महिला बॉक्सर मेरी कोमने येथे सुरू असलेल्या जागतिक महिला मुष्टियुद्ध स्पर्धेत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवून नवा इतिहास रचला. तिने जागतिक
स्पर्धेतील आपले 8 वे पदक उपांत्य फेरी गाठून निश्चित केले.
या स्पर्धेत 8 पदके जिंकणारी ती पहिली बॉक्सर ठरली आहे. पुरुष गटात क्युबाचा महान बॉक्सर फेलिक्सने जागतिक स्पर्धेत 6 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले होते. मेरीने त्याला देखील आता मागे टाकले. या स्पर्धेत
तिसरे मानांकन देण्यात आलेल्या 36 वर्षीय मेरीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोलंबियाच्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या इनग्रीट वेलेन्सियाचा 5-0 गुणांनी सहज पराभव केला.
51 किलो वजनी गटात यंदा प्रथमच खेळणार्‍या मेरीने सुरुवातीपासून जबरदस्त आक्रमक खेळ करून वेलन्सियाला विजयाची संधी दिली नाही. दोन्ही फेर्‍यांमध्ये मेरीने घेतलेली गुणांची आघाडी शेवटपर्यंत कायम राखली. तिने प्रभावी हुक आणि गॅबचा जोरदार वापर केला. मेरीच्या या शानदार विजयाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री किरण रिजुजू यांनीदेखील मेरीचे खास अभिनंदन केले. मेरीने आतापर्यंत या स्पर्धेत 6 सुवर्ण आणि 1 रौप्यपदक जिंकले आहे.
मेरी कोम पाठोपाठ जमूना लवलिना, मंजू राणी यांनीदेखील उपांत्य फेरी गाठून भारताची आणखी तीन पदके निश्चित केली. मंजू राणीने प्रथम मानांकन देण्यात आलेल्या उत्तर कोरियाच्या थिमला 4-1 गुणांनी सहज नमविले. या स्पर्धेत मंजूला 6 वे मानांकन देण्यात आले. यंदा प्रथमच ती जागतिक स्पर्धेत खेळत आहे. गेल्या वर्षीपर्यंत हरियाणाचे प्रतिनिधीत्व करणार्‍या मंजूने आता पंजाबचा रस्ता धरला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

महाराष्ट्रात आज 6 हजार 555 नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई – महाराष्ट्रात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 6 हजार 555 नवे रुग्ण आढळल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2 लाख...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

पुणे – काल आणि आज मुंबईसह उपनगर व परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली, त्यानंतर आता कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र शिक्षण

शालेय शिक्षण विभागाकडून जिओ टीव्हीवरील तीन चॅनेलचे उद्घाटन

मुंबई – लॉकडाऊन काळात ऑनलाईन शिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण विभागाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर जिओ टीव्ही प्लॅटफॉर्मवर इयत्ता बारावी विज्ञान शाखा,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन महाराष्ट्र

ऐका हो ऐका…’माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत जुनी शनाया परतणार

मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका लॉकडाऊननंतर आपल्या चाहत्यांना एक खास सरप्राईज देणार आहे. नव्या भागांसह प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

गाझियाबादमध्ये मेणबत्ती कारखान्याला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू

गाझियाबाद – उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद जिल्ह्यात एका मेणबत्तीच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत होरपळून सात जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४ जण गंभीर जखमी झाले...
Read More