सुजय विखेंना आम्ही ऑफर दिलेली! अजित पवार – eNavakal
News महाराष्ट्र राजकीय

सुजय विखेंना आम्ही ऑफर दिलेली! अजित पवार

बारामती- काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे यांनी काँग्रेसकडून नगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळत नसल्याने भाजपमध्ये प्रवेश केला. दुसरीकडे राष्ट्रवादीकडून अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना मावळ मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. या पार्श्वभूमीवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सुजय विखे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याची तयारी दर्शवली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आपण याबाबत सुजय यांच्याशी चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाही असे वाटल्याने त्यांनीच उमेदवारी नाकारली असे अजित पवार यांनी सांगितले.
बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यानंतर अजित पवार बोलताना सांगितले की, त्यांनी सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारीबाबत ऑफर देण्यात आली होती. मी आणि जयंत पाटील यांनी सुजय विखे यांच्याशी नगर दक्षिण ही राष्ट्रवादीकडील जागा देण्याबाबत चर्चा केली होती. मात्र राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचे काम करणार नाहीत अशी शंका वाटल्याने त्यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी नाकारल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Sharing is caring!

Leave a Comment

Your email address will not be published.

You may also like

Read More

post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More
post-image
News महाराष्ट्र

ट्रेकिंग करणार्‍या तरुणावर बिबट्याचा हल्ला

नाशिक – नाशिकच्या प्रसिद्ध पांडवलेणी डोंगरावर ट्रेकिंग करणार्‍या एक तरुणावर काल सकाळी बिबट्याने हल्ल्यात केला. वनविभागाने या परिसरात बिबट्याचा शोध घेतला परंतु बिबट्या हाती...
Read More
post-image
News देश

‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपट वादाच्या भोवर्‍यात! चित्रपटासाठी गीत लिहिले नाही! जावेद अख्तर

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय याने या चित्रपटात नरेंद्र...
Read More