सुजयच्या भाजपा प्रवेशाचे शरद पवारांवर खापर फोडले; राधाकृष्ण विखेंचे स्वतःची कातडी वाचविणारे उद्गार – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई राजकीय

सुजयच्या भाजपा प्रवेशाचे शरद पवारांवर खापर फोडले; राधाकृष्ण विखेंचे स्वतःची कातडी वाचविणारे उद्गार

मुंबई – काँग्रेसचे नेते व विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांनी आज टिळक भवनात पत्रकार परिषद घेतली.

ते म्हणाले की, अनेकांनी माझी प्रतिक्रिया विचारली. मी ठरविले होते की दोन दिवस सर्वांची प्रतिक्रिया जाणून मग माझी भूमिका मांडावी. नगरच्या निवडणुकीचा संघर्ष माझ्या मुलामुळे झाला हे चित्र चुकीचे आहे. जागावाटप करताना विजयाची शक्यता पाहून ज्या जागा आम्ही एकमेकांकडे मागत होतो त्यात आम्ही नगरची जागा मागितली. 2004-09-14 मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. शिर्डीची जागा काँग्रेसकडे होती. त्यामुळे ही जागाही मिळाली असती तर बरे झाले असते अशी चर्चा सुरू होती. या पूर्ण काळात माझ्या मुलाने दुसर्‍या पक्षात जावे अशी चर्चा माझ्याशी नव्हती.

मात्र नगरचा निर्णय झाला नसताना शरद पवार यांनी माझ्या वडिलांबद्दल वक्तव्य केले. आघाडीचा धर्म पाळताना ज्येष्ठ नेत्याने अशी टिप्पणी करणे योग्य नव्हते. तोपर्यंत सुजयचा निर्णयही झाला नव्हता. स्वाभिमानी व इतर पक्षांशीही चर्चा सुरु होती. तोपर्यंतच शरद पवारांचे वक्तव्य आल्यानंतर सुजयने त्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी एकदा नव्हे तर दोनदा वक्तव्य केले.

शरद पवारांनी केलेले विधान त्यांच्या व्यक्तीमत्त्वानुसार असेल, पण मी दुखावलो आहे. सध्याच्या स्थितीबाबत मी कॉंग्रेस श्रेष्ठींशी बोलून माझे म्हणणे त्यांच्यासमोर मांडणार आहे. मग ते जो निर्णय घेतील त्याप्रमाणे मी पुन्हा तुमच्यासमोर येईन. बाळासाहेब थोरांतांना उत्तर देण्यास मी बांधील नाही. नगरमध्ये मी प्रचारच करणार नाही. कारण शरद पवारांच्या मनात माझे वडील हयात नसताना इतका द्वेष आहे, तर मी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार करायला गेलो तर त्यांना आणखी संशय येईल. नगर सोडून पक्ष मला जिथे प्रचाराला जायला सांगेल तिथे मी जाईन.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या देश संपादकीय

(संपादकीय) लोकसभा निवडणुकीचे भवितव्य ‘ईव्हीएम मशीन’च्या हाती

लोकसभा निवडणुकीचे निकाल लागत असताना देशभरातील तब्बल 21 विरोधी पक्षांनी ईव्हीएम मशिनविरोधात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली त्याची कारणे काहीही असतील. तरीसुध्दा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

बदलापूरजवळ बिबट्या मृतावस्थेत आढळला

बदलापूर – बदलापूरपासून आठ किलोमीटर लांब असलेल्या ढवळे गावाच्या मागील वनविभागाच्या हद्दीत एक बिबट्या झुडपात मृतावस्थेत आढळल्याचा प्रकार आज समोर आला आहे. या बिबट्याचा...
Read More
post-image
News महाराष्ट्र

चार्‍याच्या भाववाढीमुळे पशुपालक शेतकर्‍यांचे आर्थिक गणित कोलमडले

येवला – बळीराजाचे आयुष्यच शेतीशी निगडित असल्याने पावसाच्या कृपेवर आर्थिक गणित अवलंबून असते दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यात पिण्याचा पाण्यासोबतच चार्‍याचा प्रश्नही गंभीर झाला आहे हिरव्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात कर्नाटक हापुसचे आक्रमण! स्थानिक बागायतदारांचे नुकसान

मुरुड-जंजिरा – कोकणातील हापुस आंबा आणि त्याची चव प्रसिद्ध आहे. त्या नावाखाली रायगड जिल्ह्यात काही मंडळींनी कर्नाटक हापुस आंबे टनावारी आणले आहेत. यामध्ये रायगडातील...
Read More
post-image
News मुंबई

कांदिवलीत गाडी पार्किंगचा रॅम्प कोसळल्याने 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुंबई- गाडी पार्किंगचा रॅम्प अचानक कोसळल्याने त्याखाली चिरडून सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार आज कांदिवली परिसरात घडला असून त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली...
Read More