सीमेवरील भारताची कारवाई कायम राहणार- संरक्षण मंत्री – eNavakal
Uncategoriz

सीमेवरील भारताची कारवाई कायम राहणार- संरक्षण मंत्री

नवी दिल्ली- सर्जिकल स्ट्रईकला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘पराक्रम पर्व’ साजरे केले जात असताना देशाच्या संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पाकिस्तानला कठोर शब्दांत इशारा दिला. सर्जिकल स्ट्राईक हे पाकिस्तानला देण्यात आलेले चोख प्रत्युत्तर होते. पाकने त्यातून धडा घेतला असेल किंवा नसेल पण सीमेवरील आमची कारवाई यापुढेही कायम राहणार, असे सीतारामन यांनी बजावले.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी काल मुझफ्फरनगर येथे बोलताना दोन-तीन दिवसांपूर्वी सीमेवर सर्जिकल स्टाईकसारखी मोठी कारवाई भारताने केल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. पाकिस्तानने बीएसएफ जवानाची हत्या करून मृतदेहाची जी विटंबना केली त्याचा योग्य तो बदला घेण्यात आल्याचेही सूचक विधान राजनाथ यांनी केले होते. त्यानंतर आता संरक्षणमंत्री सीतारामन यांनीही पाकिास्तानबद्दल कठोर वक्तव्य केल्याने पडद्यामागे बर्‍याच हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे.  पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जाते तसेच त्यांना दहशतवादी कारवाया करण्यासाठी भारतात धाडण्यात येते. याविरोधात नियमितपणे भारताची कारवाई सुरू असून निश्चितच यातून पाकिस्तानला जरब बसेल, असा विश्वास सीतारामन यांनी यावेळी व्यक्त केला.
उरीतील हल्ला पाकपुरस्कृतच 
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी उरी येथे केलेल्या हल्ल्यात 17 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर 28-29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये धडक देऊन सर्जिकल स्ट्राईक केले. याबद्दल बोलताना उरी हल्ला पाकपुरस्कृतच होता, असा पुनरुच्चार सीतारामन यांनी केला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

बिग बॉस मराठी २ : आज रंगणार ‘एक डाव धोबीपछाड’

मुंबई – कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी सिझन २ चा चौथा आठवडा सुरु झाला असून आज बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार आहे साप्ताहिक कार्य ‘एक...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्लांची बिनविरोध निवड

नवी दिल्ली – भाजपा नेते आणि राजस्थानच्या कोटाचे खासदार ओम बिर्ला यांची लोकसभा अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ५७ वर्षीय बिर्ला यांनी आठवेळा खासदार राहिलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

राहुल गांधींचा आज वाढदिवस! पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली – लोकसभा निवडणुक प्रचारात भाजपा सरकारला तगडी टक्कर देणारे कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा आज 49 वा वाढदिवस आहे. माजी पंतप्रधान राजीव...
Read More
post-image
महाराष्ट्र

आज अर्थसंकल्पावरून गोंधळ; विरोधकांची पायऱ्यांवर घोषणाबाजी

मुंबई – आज विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही विरोधक प्रचंड आक्रमक झाले असून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून अर्थसंकल्प फुटल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात...
Read More
post-image
दिनविशेष

दिनविशेष : प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री

प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक मा. रमेश मंत्री यांची आज पुण्यतिथी. त्यांचा जन्म. ६ जानेवारी १९२७ रोजी झाला. रमेश मंत्री हे मूळचे कुळकर कुटुंबातले. त्यांचे...
Read More