सीबीआयने चिदंबरम यांची ५ दिवसांची कोठडी मागितली – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सीबीआयने चिदंबरम यांची ५ दिवसांची कोठडी मागितली

नवी दिल्ली -आयएनएक्स मीडिया प्रकरणी अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर फरार असलेले भारताचे माजी अर्थमंत्री आणि कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना अखेर बुधवारी रात्री मोठ्या ड्रामेबाजीनंतर सीबीआयने राहत्या घरातून अटक केली. चिदंबरम यांच्या घराचे गेट बंद ठेवण्यात आल्याने त्यावरून उड्या मारून सीबीआयचे अधिकारी आत गेले व ही अटकेची कारवाई केली. तब्बल दोन तास चाललेल्या या ‘हायव्होल्टेज ड्राम्या’दरम्यान चिदंबरम यांच्या घराबाहेर समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. आज चिदंबरम यांना राऊज एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आले आहे. सीबीआयने चिदंबरम यांची ५ दिवसांची कोठडी कोर्टाकडे मागितली आहे.

आयएनएक्स मीडिया घोटाळा आणि मनी लॉँड्रींग प्रकरणी मंगळवार सायंकाळपासून ईडी आणि सीबीआयला सापडत नसलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम अखेर 27 तासांनंतर मीडिया समोर अवतरले. सायंकाळी 8.15 वाजता चिदंबरम काँग्रेसच्या मुख्य कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासोबत कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल, नेते अभिषेक मनू सिंघवी, मल्लिकार्जुन खरगे, मुकुल वासनिक, सलमान खुर्शीद उपस्थित होते. यावेळी चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. चिदंबरम म्हणाले की, राज्यघटनेच्या 21 व्या कलमाने भारतीयांना स्वातंत्र्याची हमी दिली आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागला होता. मात्र, ते स्वातंत्र्य टिकवण्यासाठी देखील आपल्याला संघर्ष करावा लागत आहे. खरेतर आयएनएस मीडियाच्या केसमध्ये मला कोणत्याही प्रकरणात आरोपी करण्यात आलेले नाही. माझ्या कुटुंबियांपैकी देखील कुणी आरोपी नाही. सीबीआय किंवा कुणीही या प्रकरणी चार्जशीट दाखल केलेली नाही. एवढेच काय, साधी एफआयआर देखील नाही. तरीही यावर चर्चा केली गेली आणि माझ्यासह माझ्या मुलाला या प्रकरणामध्ये आरोपी ठरवले गेले. गेल्या 27 तासांपासून मी माझ्या वकिलांच्या टीमसोबत बसून सर्वोच्च न्यायालयात करायच्या अपीलासंदर्भात काम करत होतो. न्याय मिळवण्यासाठी काम करत होतो आणि मीच फरार झाल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मला आश्चर्य वाटत असल्याचे चिदंबरम यांनी सांगितले. तसेच तपास संस्थांनी कायद्याचा आदर करावा, ही अपेक्षा करतो असेही चिदंबरम यांनी सांगितले.

चिदंबरम कॉँग्रेस मुख्यालयात असल्याचे समजताच सीबीआयचे पथक तेथे दाखल झाले. मात्र अवघ्या 10 मिनिटांतच पत्रकार परिषद आटोपून चिदंबरम मुख्यालयातून जोरबाग येथील घराच्या दिशेने रवाना झाले. हे समजताच सीबीआयच्या पथकानेही जोरबाग येथील त्यांचे निवासस्थान गाठले. मात्र चिदंबरम यांच्या घराचा दरवाजा उघडला जात नसल्याने सीबीआयच्या 20 ते 25 अधिकार्‍यांनी गेटच्या भिंतीवरून उड्या मारत चिदंबरम यांच्या घरात प्रवेश केला. त्याच दरम्यान ईडीचे पथकही चिदंबरम यांच्या निवासस्थानी दाखल झाले. सीबीआयच्या अधिकार्‍यांनी गेट उघडून ईडीच्या अधिकार्‍यांना चिदंबरम यांच्या घरी घेतले. त्याचदरम्यान सीबीआयच्या 5 अधिकार्‍यांकडून चिदंबरम यांची घरातील पहिल्या मजल्यावर चौकशी सुरु करण्यात आली. चिदंबरम यांना अटक होणार असल्याने त्यांचे समर्थकही घराबाहेर गोळा झाले होते. त्यामुळे येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. चिदंबरम यांच्या समर्थकांकडून सरकारविरोधात, पंतप्रधान मोदी, अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘नही चलेगी, नही चलेगी, तानाशाही नही चलेगी’, अशा घोषणा देत चिदंबरम समर्थक धरणे आंदोलनावर बसले होते. चिदंबरम यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात समर्थक जमल्याने सीबीआयच्या अधिकार्‍यांनी दिल्ली पोलिसांना पाचारण केले. दिल्ली पोलीस उपायुक्त आणि सहआयुक्तांनी आपल्या पथकासह चिदंबरम यांच्या घराजवळ दाखल होत समर्थकांना चांगलेच पांगवले. तर काही समर्थकांना ताब्यात घेतले. या मोठ्या ड्रामेबाजीनंतर चिदंबरम यांना सीबीआयने सुमारे पाऊण तास झालेल्या चौकशीनंतर रात्री 10.16 मिनिटांनी अटक केली.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

एमआयएमचे दरवाजे बंद आहेत! पुण्यात प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्य

पुणे – विधानसभा निवडणुकीकरिता युती करण्यासाठी एमआयएमकडून दरवाजे बंद आहेत. मात्र, वंचित आघाडी एकत्र येण्यास तयार आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर...
Read More
post-image
News मुंबई

हार्दिक पंड्याने पहिल्यांदाच दिली प्रेमाची कबुली

मुंबई- हार्दिक पंड्याच्या आयुष्यात पुन्हा एका नव्या प्रेमाची एन्ट्री झाली आहे. आपल्या हेलिकॉप्टर शॉटने भल्याभल्या गोलंदाजांना भोवळ आणणारा हार्दिक अभिनेत्री, डान्सर नताशा स्टेन्कोविकच्या प्रेमात...
Read More
post-image
News देश

आसाराम बापूला दणका! हायकोर्टाने याचिका फेटाळली

जयपूर – अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी आध्यात्मिक गुरु आसाराम बापुला राजस्थान हायकोर्टाने जोरदार दणका दिला. याप्रकरणी झालेली जन्मठेपेची शिक्षा रद्द व्हावी, यासाठी आसाराम बापुने दाखल...
Read More
post-image
News देश

जादवपूर विद्यापीठाबाहेर अभाविपच्या कार्यकर्त्यांची पोलिसांवर दगडफेक

कोलकाता – कोलकातामधील जादवपूर विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्री बाबूल सुप्रियोंना झालेल्या धक्काबुकीच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी जमा झाले आहेत....
Read More
post-image
News महाराष्ट्र

कॉँग्रेस-राष्ट्रवादीत घोळ अजूनही सुरुच

मुंबई- विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसने आज दुपारी जाहीरनामा प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र आघाडीचा एकच जाहीरनामा प्रकाशित करण्याचा निर्णय आधीच...
Read More