सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या – eNavakal
आघाडीच्या बातम्या गुन्हे मुंबई

सीनिअर डॉक्टर्सच्या रॅगिंगला कंटाळून महिला डॉक्टरची आत्महत्या

मुंबई – वरिष्ठ महिला डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगला कंटाळून मुंबईतल्या नायर रुग्णालयातील महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव आहे. ती मूळची जळगावची होती. तीन वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर्सनी केलेल्या रॅगिंगला कंटाळून पायलनं गळफास लावून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी तीन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबईतल्या नायर रुग्णालयात सीनिअर डॉक्टरांकडून होणाऱ्या रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून पायलने काल रात्री मुंबई येथे वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी पायलचा मृतदेह जळगावमध्ये आणण्यात आला. त्यावेळी संतप्त नातेवाईकांनी तिचा मृतदेह थेट जिल्हाधिकारी कार्यालयात नेला. दोषींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. पायलच्या आईने रॅगिंगबाबत १० मे रोजी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. परंतु प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेता कारवाई न झाल्याने तिने आत्महत्येचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

दहीहंडी निमित्त आज शाळांना सुट्टी जाहीर

मुंबई- दहीहंडी उत्सव असल्याने उद्या शनिवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उद्या...
Read More
post-image
News देश

राहुल गांधी आज काश्मिरला जाणार

नवी दिल्ली- कॉँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे विरोधी पक्षाच्या 9 नेत्यांसोबत आज  काश्मिरच्या दौर्‍यावर जाणार आहेत. जम्मू-काश्मिरमधील कलम 370 रद्द केल्यानंतर राहुल गांधी यांचा...
Read More
post-image
News मुंबई

विमानतळ धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश करणार्‍या तरुणाला अटक

मुंबई – विमानतळाच्या धावपट्टीवर अनधिकृत प्रवेश केल्याप्रकरणी एका 24 वर्षांच्या तरुणाला काल विमानतळ पोलिसांनी अटक केली. कामरान अब्दुल हलीम शेख असे या आरोपी तरुणाचे...
Read More
post-image
News मुंबई

मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर रविवार 25 ऑगस्टला मेगाब्लॉक

मुंबई- मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गावर सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवार 25 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर सकाळी 11.20...
Read More
post-image
News महाराष्ट्र

आम आदमी पार्टी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक लढवणार

मुंबई – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकांसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले असताना आता ‘आम आदमी पक्षाने’ महाराष्ट्रात विधानसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली आहे. ‘आप’चे राष्ट्रीय...
Read More