सीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ शमाज सिद्धीकी चौकशीच्या फेर्‍यात – eNavakal
News गुन्हे मुंबई

सीडीआर प्रकरण : नवाजुद्दीनचा भाऊ शमाज सिद्धीकी चौकशीच्या फेर्‍यात

* सीडीआर प्रकरणात 16 वा आरोपी चौकशीच्या ससेमिर्‍यात
ठाणे – सीडीआर प्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने आतापर्यंत तब्बल 15 आरोपीना अटक केली. आहे तर अनेक लोक अजूनही पोलिसांच्या रडारवर आहेत. सोमवारी ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला चौकशीसाठी दुपारी 2 वाजता बोलावण्यात आले होते. रात्री पर्यंत त्याचव्ही चौकशी सुरु असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्धीकी याचे नाव आले होते. पोलिसांनी अटक केलेल्या 15 आरोपीनि काढलेल्या सीडीआरच्या ऍनालिसिस केल्यानंतर एक एक नाव पुढे येत आहे. आता ठाणे गुन्हे शाखा युनिट-1 च्या पोलिसांनी नवाजुद्दीन सिद्धीकी याचा भाऊ शमाज सिद्धीकी याला सोमवारी चौकशीसाठी ठाणे पोलिसांच्या कार्यालयात बोलावण्यात आले होते. पोलीस पथकाने शमाज याला गुन्हे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या समोर उभे केले. त्रिमुखे यांनी त्याला पुन्हा चौकशीसाठी गुन्हे शाखा युनिट-1 च्या कार्यालयात पाठविले. दुपारपासून त्याची सोमवारी रात्री उशिरा पर्यंत चौकशी पोलीस पथक करीत होते. चौकशीत त्याने काय सांगितले याबाबत माहिती मिळू शकली नाही. मात्र आपण पोलिसांच्या चौकशीला सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांकडे शमाज यांनी व्यक्त केली. ’

 

 

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; शरद पवारांनी केली घोषणा

बीड – विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बीड दौऱ्यात बीडचे उमेदवार जाहीर केले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन मुंबई

अमिताभ बच्चन यांच्या जलसाबाहेर मुंबईकरांची निदर्शने

मुंबई – ‘मेट्रो-३’ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे कॉलनीतील वृक्षतोडीला मुंबईकरांचा तीव्र विरोध होत असताना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी मुंबई मेट्रोला पाठिंबा देत या सेवेचे...
Read More
post-image
महाराष्ट्र

गणपतीपुळे समुद्रात बुडणार्‍या ३ पर्यटकांपैकी दोघांना वाचविले, १ जण बेपत्ता

रत्नागिरी – रत्नागिरीच्या गणपतीपुळे समुद्रात तिघेजण बुडाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. यातील दोघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे, तर एक जण अद्यापही बेपत्ता...
Read More
post-image
महाराष्ट्र

अपना सहकारी बँकेमध्ये दत्ताराम चाळके पॅनल विजयी

मुंबई – राज्याच्या बँकिंग क्षेत्रातील एका नावाजलेली बँक समजल्या जाणार्‍या अपना सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत बँकेचे विद्यमान अध्यक्ष दत्ताराम चाळके यांच्या अपना...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या निवडणूक महाराष्ट्र

केंद्रीय निवडणूक आयोगाची आज मुंबईत पत्रकार परिषद

मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयुक्त आणि इतर दोन वरिष्ठ अधिकारी मंगळवारी मुंबईत दाखल झाले आहेत. देशाचे मुख्य निवडणूक...
Read More