सीएसएमटी जवळील पुलाचा सांगाडा जमीनदोस्त – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

सीएसएमटी जवळील पुलाचा सांगाडा जमीनदोस्त

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पुलाचा अर्धा भाग कोसळून गुरुवारी मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू तर ३४ जण जखमी झाले होते. या पुलाचा सांगाडा काल रात्री साडेआठच्या सुमारास जमीनदोस्त करण्यात आला. यावेळी सीएसएमटी लगतचा डी. एन. रोड वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता आज ही वाहतूक पूर्ववत करण्यात आली आहे.

सीएसएमटी येथील या दुर्घटनेनंतर सुरुवातीला पूल मुंबई पालिकेच्या मालकीचा आहे की रेल्वेच्या मालकीचा आहे असा वाद रंगला होता. शेवटी पालिकेने हा पूल आपल्या मालकीचा असल्याचे कबूल केले. दरम्यान, दुर्घटनेत पुलासोबत अनेक पादचारी खाली कोसळले होते. या सर्वांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढून विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण ढिगारा हटवून रस्ता मोकळा करण्यात आला आणि पुलाचा लोखंडी सांगाडा पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. काल दिवसभर हे काम सुरू होते. रात्री साडेआठच्या सुमारास कटरच्या सहाय्याने पुलाचा लोखंडी सांगाडा कापून जंबो क्रेनद्वारे तो अलगद खाली उतरवण्यात आला.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
ट्रेंडिंग देश

आंतरराष्ट्रीय चहा दिन : सुर्रर्र के पियो!

‘सुर्रर्र के पियो’! हे वाक्य ऐकल्यानंतर अर्थात सर्वात प्रथम डोळ्यासमोर येतो तो गरमागरम चहा.  अनेकांना सकाळी उठल्यावर चहा  घेतल्याशिवाय कामाची तरतरी येत नाही. हल्ली...
Read More
post-image
महाराष्ट्र

पालघर आजही भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

पालघर – आज सलग तिसऱ्या दिवशी पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले. जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी तालुक्यात आज पहाटे 5 वाजून २2 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची...
Read More
post-image
देश

१३ दिवसांच्या उपोषणाने स्वाती मालीवालची प्रकृती बिघडली

नवी दिल्ली – बलात्कार करणाऱ्या व्यक्तीला अटक केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी गेल्या १३ दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या...
Read More
post-image
महाराष्ट्र राजकीय

उद्धव ठाकरेंचे सर त्यांच्याविषयी सांगतात…

मुंबई – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार आहेत, ही बाब कमी जणांना माहित आहे. मात्र त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या क्रीडा

विराटची टीम इंडिया आज वेस्ट इंडीजला भिडणार

चेन्नई – टी-२० मालिकेपाठोपाठ आजपासून भारत-वेस्ट इंडीज यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला प्रारंभ होत आहे. विराट कोहलीचा भारतीय संघ दक्षिण आफ्रिका, बांगलादेश यांच्यापाठोपाठ आता...
Read More