आठ तासांच्या प्रयत्नांनतर तो पुल पाडला – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई

आठ तासांच्या प्रयत्नांनतर तो पुल पाडला

मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळून गुरुवारी मोठी दुर्घटना घडली. यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने ही दुर्घटना घडली. सध्या उर्वरित पूल पाडण्याचे काम महापालिकेकडून सुरु करण्यात अाले होते. पालिका कर्मचारी, अग्निशमन दल, पोलीस अधिकारी पूल पाडण्याासाठी घटनास्थळावर उपस्थित होते. अखेर अाठ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा पुल पाडण्यात अाला. रात्री १२ नंतर हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात अाला.

या दुर्घटनेत काल अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह यांचा मृत्यू झाला. यापैकी अपूर्वा आणि रंजना या परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. काहीजण या पूलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. त्यामुळे सर्वजण खाली कोसळले. यामध्ये ३४ जण जखमी झाले आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

…तर मिशा ठेवणार नाही! उदयनराजेंचे आयोगाला आव्हान

मुंबई – लोकसभा निवडणुकीच्यावेळी सदोष ईव्हीएम यंत्रांमुळे सातारा मतदारसंघात प्रत्यक्षात झालेले मतदान आणि प्रत्यक्ष मतमोजणी यामध्ये तफावत आढळून आली होती. त्यामुळे निवडणूक आयोगाने माझ्या...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शरद कळसकरला 8 जुलैपर्यंत कोठडी

कोल्हापूर – कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने आज 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कळसकरला 8...
Read More
post-image
News मुंबई

सरकारी कर्मचार्‍यांचा 27 जूनला ‘लक्षवेध’ दिन

मुंबई – पाच दिवसांचा आठवडा, सेवानिवृत्तीचे वय 60 करावे आणि अन्य मागण्यांसाठी 27 जूनला सरकारी कर्मचारी लक्षवेध दिन पाळणार आहे आणि तरीही मागण्या मान्य...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

जलयुक्त शिवार योजनेत गैरव्यवहार! सरकारनेच दिली कबुली

मुंबई – एकीकडे महाराष्ट्र सरकार दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांनी सरसकट कर्जमाफी, चारा छावण्या आणि पाण्याच्या टँकरसह जलयुक्त शिवार योजनेसाठी लाखो कोटी रुपये दिल्याची फुशारकी मारत असतानाच...
Read More
post-image
News महाराष्ट्र

इंद्रायणीचे पाणी दूषित! तीर्थ म्हणून पिऊ नका

आळंदी – आषाढी एकादशी यात्रेनिमित्त ज्ञानेश्वर माऊली पालखीच्या प्रस्थानासाठी आळंदीत दाखल झालेल्या भाविकांनी इंद्रायणी नदीतील पाण्याचे तीर्थ म्हणून आचमन करू नये, असे आवाहन दस्तुरखुद्ध...
Read More