‘सीईटी’परिक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाहीच-सुप्रीम कोर्ट – eNavakal
News देश न्यायालय

‘सीईटी’परिक्षेसाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण नाहीच-सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली- प्रवेश पात्रतेसाठी होणार्‍या परीक्षेत (सीईटी) कोणत्याही प्रकारचे आरक्षण दिले जाऊ शकत नाही आणि अशी मागणीच मुळात पूर्णत: चुकीची आहे, असे स्पष्ट मत आज सुप्रीम कोर्टाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान नोंदवले. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा- 2019 (सीटीईटी) मध्ये आर्थिक मागासांसाठी 10 टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्या. इंदिरा बॅनर्जी आणि न्या. संजीव खन्ना यांच्या सुट्टीकालीन खंडपीठापुढे आज सुनावणी झाली असता अशा आरक्षणास कोर्टाने स्पष्ट नकार दिला.
कोणत्याही वर्गाने प्रवेशासाठी आरक्षणाची मागणी केल्यास त्याचा विचार होऊ शकतो. मात्र प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आरक्षण दिले जाऊ शकत नाही. ही धारणाच मुळात चुकीची आहे. ही परीक्षा पात्रतेसाठी होत असून आरक्षणाचा मुद्दा केवळ प्रवेशावेळीच उपस्थित होऊ शकतो, असे मतही कोर्टाने पुढे नोंदवले. याचिकादार रजनीशकुमार पांडे यांच्या वकिलांनी सीटीईटी परीक्षेच्या अधिसूचनेकडे लक्ष वेधले असता यात अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारे आरक्षण देण्यात आलेले नाही, असे कोर्टाने सांगितले. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाची मागणी फेटाळत ही याचिका निकाली काढण्याचेच निश्‍चित केले होते. मात्र याचिकादारांनी आग्रह धरल्याने 16 मे रोजी या याचिकेवर फेरविचार करण्याची तयारी कोर्टाने दर्शविली आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More