सीआरपीएफ तळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड भारताच्या ताब्यात – eNavakal
आघाडीच्या बातम्या देश

सीआरपीएफ तळावरील हल्ल्याचा मास्टरमाइंड भारताच्या ताब्यात

नवी दिल्ली – संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) जैश-ए-मोहम्मदच्या निसार अहमद तांत्रे दहशतवाद्याला भारताकडे सोपवले आहे. निसार अहमद तांत्रे हा डिसेंबर २०१७ मध्ये सीआरपीएफच्या जम्मू-काश्मीरमधील लेथपोरा तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. त्याला रविवारी विशेष विमानाने दिल्लीला आणणण्यात आले. तिथून त्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने ताब्यात घेतले.

लेथपोरा तळावर ३० आणि ३१ डिसेंबरच्या रात्री झालेल्या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान शहीद झाले तर जैशच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. निसार तांत्रे हा जैशच्या दक्षिण काश्मीरचा विभागीय कमांडर नूर तांत्रे यांचा भाऊ आहे. एनआयए कोर्टाच्या विशेष न्यायाधीशांनी निसारविरोधात अटक वॉरंट जारी केले होते. याच आधारे त्याला यूएईकडून भारतात आणले गेले. नूर तांत्रे यानेच जैश-ए-मोहम्मद या संघटनेला काश्मीर खोऱ्यात जम बसवायला मदत केली असे मानले जाते. नूरला डिसेंबर २०१७ मध्ये ठार करण्यात आले. दरम्यान, संयुक्त अरब अमिरातीने देशात गुन्हे करुन फरार झालेले आरोपी, दहशतवादी यांना पुन्हा भारताकडे सोपवून खरोखरचे चांगले उदहारण समोर ठेवले आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

राज्यातील पहिल्या टेलिआयसीयू प्रकल्पाचा भिवंडीत शुभारंभ

मुंबई – भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भिवंडी येथील उपजिल्हा रुग्णालयात राज्यातील पहिल्या टेलीआयसीयु प्रकल्पाचा ऑनलाईन शुभारंभ आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. अतिदक्षता...
Read More
post-image
देश मनोरंजन

गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली

मुंबई – सुप्रसिद्ध गायक एस.पी.सुब्रमण्यम यांची कोरोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना आता अतिदक्षता विभागात हालवण्यात आलं असून, डॉक्टर्स त्यांच्यावर...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र मुंबई

राज्यात आज 12 हजारपेक्षा जास्त रुग्णांची नोंद, तर 10 हजारपेक्षा जास्त रुग्णांना डिस्चार्ज

मुंबई, दि.१४ : राज्यात १० हजार ४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख ०१ हजार ४४२ रुग्ण बरे झाले...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

स्वातंत्र्यादिनानिमित्त राज्यातील 58 पोलिसांचा गौरव, केंद्राकडून पोलिस पदके जाहीर

नवी दिल्ली – 74व्या भारतीय स्वातंत्र्यादिनानिमतित्त देशातील एकूण ९२६ पोलीस कर्मचाऱ्यांना पदके प्रदान करण्यात येणार आहेत. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने आज त्यांची नावे जाहीर केली. पोलिसांच्या...
Read More
post-image
Uncategoriz

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची मदत

मुंबई – कर्तव्य बजावताना कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झालेल्या परभणी जिल्ह्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याच्या वारसास ५० लाख रुपयांची विमा कवच रक्कम अदा करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती ग्रामविकास...
Read More