सीआयएमुळे रशियात मोठ्या बॉम्बहल्ल्याचा कट उधळला, 7 दहशतवाद्यांना अटक – eNavakal
गुन्हे विदेश

सीआयएमुळे रशियात मोठ्या बॉम्बहल्ल्याचा कट उधळला, 7 दहशतवाद्यांना अटक

वॉशिंग्टन- सेंट पीटर्सबर्गवरील मोठा दहशतवादी हल्ला टळला. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएने वेळीच माहिती दिल्याने ही आपत्ती टळल्याचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटले आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना फोन करून पुतीन यांनी सीआयएने दिलेल्या माहितीविषयी कृतज्ञता व्यक्त केली. व्हाइट हाऊसच्या सूत्रांनी फोन कॉलविषयी माहिती दिली. दोन्ही राष्ट्राध्यक्षांदरम्यान झालेल्या संवादाचा सारांश व्हाइट हाऊसने जारी केला.

क्रेमलिन प्रशासनाच्या वतीनेदेखील याविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सीने (सीआयए) दिलेल्या माहितीमुळे रशियाच्या केंद्रीय सुरक्षा सेवेद्वारे (एफएसबी) संशयितांना पकडण्यास मदत मिळाली. सेंट पीटर्सबर्ग येथील वर्दळीच्या ठिकाणी आत्मघातकी हल्ला करण्याची त्यांची योजना होती. व्हाइट हाऊसच्या माध्यम प्रवक्त्या साराह सँडर्स यांनी सांगितले की, ट्रम्प यांनी पुतीन यांच्या फोन कॉलची प्रशंसा केली आहे. अमेरिकेची गुप्तहेर संस्था सीआयएच्या माहितीमुळे अनेक निरपराधांचे जीव वाचले हेच आपले यश असल्याचे या वेळी ट्रम्प म्हणाले. पुतीन यांनी सीआयए आणि त्याचे निर्देशक माइक पोम्पिआे यांचे आभार मानले. पुतीन यांनी ट्रम्प यांच्याशी फोनवर चर्चा केली. सिरिया मुद्द्यावरदेखील उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या साराह सँडर्स यांनी सांगितले. दहशतवादाच्या खात्म्यासाठी माहितीची देवाणघेवाण भविष्यातही केली जाईल यावर उभय नेत्यांत सहमती झाली. ट्रम्प यांनी सीआयएचे निर्देशक माइक पॉम्पिआे यांच्या कामगिरीचे कौतुक केले. रशियाच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फेडरल सेक्युरिटी सर्व्हिस या रशियातील संरक्षण यंत्रणेने सेंट पीटर्सबर्गमध्ये स्फोटाचा कट रचणाऱ्या ७ दहशतवाद्यांना अटक केले. या प्रकरणी पहिली अटक शुक्रवारी झाली होती. दहशतवादी रविवारी स्फोट घडवून आणण्याच्या तयारीत होते. इसिसने रशियाविरुद्धदेखील अनेकदा हल्ल्याचे कट रचले आहेत. २०१५ मध्ये इजिप्तमध्ये रशियन विमान पाडल्याचा दावा इसिसने केला होता. यामध्ये २२४ प्रवाशांचा बळी गेला. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, स्पेशल कौन्सिलर रॉबर्ट मुलर यांना बडतर्फ करण्याचा आपला विचार नाही. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ट्रम्प यांनी हे उत्तर दिले. डेमोक्रॅटिक लोकप्रतिनिधींनी मुलर यांना बडतर्फ केले जाऊ शकते, अशी शंका व्यक्त केली होती. मुलर २०१६ च्या राष्ट्राध्यक्ष निवडणूक प्रचारादरम्यानच्या रशिया संधानाविषयी तपास करत आहेत.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

राज्यात आज २०९१ नवे रुग्ण; आतापर्यंत १६ हजाराहून अधिक जण कोरोनामुक्त

मुंबई -राज्यात आज नव्या २०९१ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून २४ तासांत ९७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज ११६८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

ज्याला आम्ही ताब्यात घेतलं होतं त्याला भारताने हिरो बनवलं – शाहिद आफ्रिदी

नवी दिल्ली – भारतीय हवाई दलाचा अधिकारी अभिनंदन वर्थक यांचा उल्लेख करत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने  भारतावर बोचरी टीका केली आहे. ज्याचं विमान...
Read More
post-image
ट्रेंडिंग

आता घाला स्वतःच्याच चेहऱ्याचा प्रिंटेड मास्क

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर वापरणं गरजेचं आहे. अशातच मास्कच्या अनेक नवनव्या डिजाईन बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. काही फॅशन डिझायनरने स्टयलिश असे मास्क...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मुंबई

धारावीत सोशल डिस्टंसिंगचा फज्जा; गावी जाण्यासाठी मजुरांच्या लांबच लांब रांगा

मुंबई – कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धावारीत आज मजुरांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. गावी जाण्यासाठी हजारो मजूर येथे जमले होते. त्यामुळे मजुरांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या राजकीय

…तर त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ नये; नवाब मलिक यांचा विरोधकांवर घणाघात

मुंबई – ‘ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देऊ, नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक...
Read More