सिलिच फायनलमध्ये! कॅरोलिन-हेलेप अंतिम झुंज – eNavakal
क्रीडा विदेश

सिलिच फायनलमध्ये! कॅरोलिन-हेलेप अंतिम झुंज

मेलबर्न – यंदाच्या वर्षातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रॅण्ड स्लॅम टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष एकेरीत क्रोएशियाच्या मरिन सिलिचने प्रथमच अंतिम फेरी गाठली तर महिला गटात सिमोना हेलेप – कॅरोलिन वुझनिकी यांच्यात शनिवारी जेतेपदासाठी प्रथमच मुकाबला होईल.                                  पुरुष एकेरीच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात क्रोएशियाच्या मरिन सिलिचने इंग्लंडच्या कायल एडमंडचा 3 सेटमध्ये 6-2, 7-6, 6-2 असा पराभव केला. पहिल्या सेट सहज जिंकणार्‍या सिलिचला दुसर्‍या सेटमध्ये एडमंडने चांगली झुंज दिली. अखेर तो सेट सिलिचनेेे टायब्रेकवर जिंकून सामन्यात 2 -0 अशी आघाडी घेतली. तिसर्‍या सेटमध्ये मात्र, सिलिचने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करून एडमंडला विजयाची संधी दिली नाही. सध्या जागतिक क्रमवारीत 6 व्या क्रमांकावर असलेल्या सिलिचला या क्रमवारीत बढती मिळणार असून, लवकरच तो तिसर्‍या क्रमांकावर झेप घेईल. रविवारी अंतिम फेरीत त्याचा मुकाबला फेडरर, चुंग यांच्यातील विजेत्याशी होईल. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात पाचव्या सेटमध्ये सिलिचविरुद्धच्या लढतीत नादालने गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यामुळे सिलिचला या लढतीत विजयी घोषित करण्यात आले.
महिला गटाच्या उपांत्य फेरीच्या या पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असलेल्या सिमोना हेलेपने जर्मनीच्या अँजेलिका कर्बरचा 6-3, 4-6, 9-7 असा 3 सेटमध्ये चुरशीच्या लढती पराभव करून अंतिम फेरी गाठली. या स्पर्धेची आता तिने प्रथमच अंतिम फेरी गाठली आहे. पहिला सेट सिमोनाने सहज जिंकून सामन्यात चांगला प्रारंभ केला. पण पुढच्या 2 सेटमध्ये अँजेलिकाने तिला चांगली झुंज दिली. शेवटचा सेट टायब्रेकवर जिंकून अखेर सिमोनाने सामना खिशात टाकला.
दुसर्‍या सामन्यात कॅरोलिन वुझनिकीने बेल्जियमच्या एलिस मर्टनचा सरळ 2 सेटमध्ये 6-3, 7-6 असा पराभव करून प्रथमच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. आता शनिवारी विजेतेपदासाठी सिमोना-कॅरोलिना यांच्यात निर्णायक लढत होईल. विजेती खेळाडू जागतिक क्रमवारीतदेखील अव्वल क्रमांकावर झेप घेईल. कॅरोलिनाने अद्याप एकही ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धा जिंकलेली नाही. गेल्यावर्षी ती सहा स्पर्धांत उपविजेती ठरली होती. आतापर्यंत तिने 25 आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. या अगोदर 2011 मध्ये तिने येथे उपांत्य फेरी गाठली होती. पण लिनाकडून ती पराभूत झाली होती.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
महाराष्ट्र

नवी मुंबईत मुसळधार! सिडकोच्या स्वप्नपूर्ती सोसायटीत गुडघाभर पाणी

नवी मुंबई – कालपासून कोसळणाऱ्या पावसाने मुंबईसह उपनगर आणि परिसरात दाणादाण उडवली आहे. नवी मुंबईतही मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसाचा फटका सिडकोने खारघरमध्ये...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

कर्मचाऱ्यांना कामावरून काढू नका, मुख्यमंत्र्यांचे हॉटेल चालकांना आवाहन

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे मोठे स्थान...
Read More
post-image
महाराष्ट्र

शिर्डीचे साईमंदिर खुले करण्याची तयारी पूर्ण! मात्र शासनाचा आदेश येणे बाकी

शिर्डी – शिर्डीचे साईमंदिर भाविकांसाठी खुले करण्यासाठी साई संस्थानने तयारी पूर्ण केली असून शासनाचा आदेश येणे बाकी आहे. तो आदेश येताच सुरक्षेचे नियम पाळून...
Read More
post-image
देश राजकीय

निर्मला सीतारमण या काळी नागीण! तृणमूलच्या नेत्यांची जीभ घसरली

कोलकाता – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावर टीका करताना पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे नेते कल्याण बॅनर्जी यांची जीभ घसरली. सीतारमण यांची तुलना बॅनर्जी यांनी...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या कोरोना महाराष्ट्र

राज्यात २४ तासांत ४ पोलिसांचा कोरोनाने मृत्यू, ३० जणांना लागण

मुंबई – महाराष्ट्रात कोरोनाचा फैलाव वेगाने होत असून लॉकडाऊनच्या नियमांचे नागरिकांनी काटेकोर पालन करावे यासाठी रस्त्यावर उतरलेले राज्यातील पोलीसच आता कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत....
Read More