सिमल्यात भीषण पाणी टंचाई; 5 दिवस शाळा बंद राहणार – eNavakal
देश

सिमल्यात भीषण पाणी टंचाई; 5 दिवस शाळा बंद राहणार

सिमला – हिमाचल प्रदेशातील सिमला या राजधानी शहरात गेल्या काही दिवसापासून पाणी टंचाईने भीषण स्वरुप प्राप्त केले आहे. या पाणी समस्येमुळे आता जिल्ह्यातील सरकारी शाळा 5 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हिमाचल प्रदेशच्या शिक्षण विभागाने दिलेल्या आदेशानुसार या जिल्ह्यातील सर्व सरकारी शाळा उद्या सोमवार 5 जून ते 8 जूनपर्यंत बंद ठेवल्या जाणार आहेत. थेंब-थेंब पाण्यासाठी सिमल्यातील नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. सरकार जनतेला पाणी देण्यास असमर्थ ठरत आहे. काही भागात पाणीपुरवठा केला जातो. तर काही ठिकाणी पाण्याच्या ठणठणाट जाणवतो.

दरम्यान, काल मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयालाच साद घातली. मुख्यमंत्र्याच्या मते यावर्षी कमी पाऊस आणि जास्त बर्फवर्षाव झाल्यामुळे ही पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे सिमल्यातील नैसर्गिक पाणी स्त्रोतामध्ये पाणी स्तर फारच खाली गेला आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मराठा समाजाच्या आरक्षणावर गुरुवारी अंतिम निर्णय

मुंबई – महाराष्ट्र सरकारने राज्यातील मराठा समाजाला दिलेले १६ टक्के आरक्षण कायदेशीर आहे की, बेकायदेशीर आहे याचा निकाल मुंबई उच्च न्यायालय गुरुवारी २७ जूनला...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या न्यायालय महाराष्ट्र

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी डॉक्टरांना जामीन नाही

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या डॉ. भक्ती मेहेर, डॉ. हेमा आहुजा आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मुंबई-पुणे महामार्ग उद्या अर्धा तास बंद राहणार

मुंबई – पुणे-मुंबई मार्गावर परंदवाडी येथे महावितरणची ओव्हरहेड हायटेंशन केबल तुटली असून तिचे काम करण्यासाठी उद्या पूर्ण रस्ता बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या...
Read More
post-image
मुंबई

मुंबई महापालिका मुख्यालयात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई – एका ३० वर्षीय तरुणाने मुंबई महापालिका मुख्यालयात आयुक्तांच्या दालनासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. सुदाम शिंदे असे या तरुणाचे नाव असून...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या मनोरंजन

करण जोहर ठरला सर्वाधिक लोकप्रिय भारतीय चित्रपट निर्माता

मुंबई – चित्रपट निर्माता करण जोहर बॉलिवूडच्या लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. स्कोर ट्रेंड्स इंडियाने गेल्या सहा महिन्यातील बॉलिवूडच्या सर्वाधिक लोकप्रिय चित्रपट निर्मात्यांची नुकतीच एक...
Read More