#KarnatakaVote सिद्धरामय्यांनी आता कानडी लोकांची माफी मागावी – eNavakal
देश राजकीय

#KarnatakaVote सिद्धरामय्यांनी आता कानडी लोकांची माफी मागावी

कलबुर्गी – कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आता कानडी लोकांची माफी मागावी. ते कर्नाटकचे मुख्यमंत्री असुन त्यांनी चिकोडीत मराठी माणसांसमोर माफी मागून कानडी अस्मितेचा अपमान केला आहे. मराठी मतांसाठी ते लांगुलचालनाचे राजकारण करत असुन त्यांना कर्नाटकप्रेमी कानडी माणूस माफ करणार नाही, असा आरोप भाजपाचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडुअरप्पा यांनी कलबुर्गीत (गुलबर्गा) केला.

सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात असताना मुख्यमंत्र्यानी असे विधान करण्याची गरज नव्हती, असे म्हणुन येडुअरप्पा यांनी नव्या भाषिकवादाला आमंत्रण दिले आहे. कर्नाटकाच्या काही भागांमध्ये कानडी सोडून मराठी, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम भाषिकांची बऱ्यापैकी संख्या असुन काँग्रेस कायमच या लोकांच्या पाठीशी उभी राहिली आहे. तर कर्नाटकात भाजपाने सुरुवातीपासूनच येडुअरप्पा यांच्या नेतृत्त्वाखाली अस्मितेच्या राजकारणास खतपाणी घातले आहे. आता येडुअरप्पा यांच्या या आरोपावर सिद्धरामय्या नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News देश निवडणूक

बिहारमध्ये महाआघाडीचे जागावाटप जाहीर

पाटणा – लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमध्ये आज महाआघाडीच्या जागावाटपाची घोषणा झाली. राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस, हिंदुस्थानी आवाम मोर्चा, राष्ट्रीय लोक समता पार्टी या पक्षांच्या महाआघाडीने...
Read More
post-image
News महाराष्ट्र

एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आक्रमक

रत्नागिरी – एलईडी मासेमारी विरोधात मच्छिमार आता आक्रमक झाले आहेत. याच विषयासंदर्भात रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांची एक समन्वय समिती स्थापन करण्यात...
Read More
post-image
News देश

फुटीरतावादी यासिन मलिकच्या संघटनेवर केंद्र सरकारची बंदी

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासिन मलिकला केंद्र सरकारने आणखी एक दणका दिला आहे. यासिन मलिकच्या ‘जम्मू-काश्मीर लिब्रेशन फ्रंट’वर केंद्र सरकारने बंदी घातली आहे....
Read More
post-image
News महाराष्ट्र

आजरा कारखान्याच्या कर्मचार्‍यांनी अध्यक्षांच्या दालनाला ठोकले टाळे

कोल्हापूर – आजरा साखर कारखाना कर्मचारी व सत्ताधारी मंडळींचा संघर्ष टोकाला गेला असून आज कर्मचारी संघटनेने बोलाविलेल्या बैठकीला अध्यक्ष अशोक चराटी व उपाध्यक्ष आनंदराव कुलकर्णी...
Read More
post-image
News न्यायालय महाराष्ट्र

कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरण तेलतुंबडेंच्या जामीनावर 2 एप्रिलला सुनावणी

मुंबई – पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव हिंसाचारामागे माओवाद्यांची सबंध असल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेल्या प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांंच्या अटकपूर्व जामीन अर्जाची सुनावणी 2 एपिलपर्यंत...
Read More