सिडको जमीन व्यवहार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री – eNavakal
Uncategoriz आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

सिडको जमीन व्यवहार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी – मुख्यमंत्री

नागपूर : सिडको येथील जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विरोधकांवर जोरदार हल्ला चढविला. सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह आघाडी सरकारच्या काळात अशाच प्रकारे देण्यात आलेल्या २०० जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना या प्रकल्पग्रस्तांना ६६० हेक्टर जमिनीचे वाटप करण्यात आले होते. या जमिनी जिल्हाधिका-यांच्या अखत्यारितील असून आघाडी सरकारच्या काळात जिल्ह्याधिका-यांचे अधिकार वाढवण्यात येवून, जमीन व्यवहाराचे अधिकार चव्हाणांच्या काळात अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना दिले असल्याने याचा संबंध मंत्र्यांशी नाही. शेजा-यांच्या सांगण्यावरून बिनबुडाचे आरोप करू नका, असा टोला यावेळी फडणवीस यांनी चव्हाणांना लगावला.

सिडकोच्या जमीन वाटप प्रकरणासह आघाडी सरकारच्या काळात अशाच प्रकारे देण्यात आलेल्या सुमारे २०० जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. हम काच के घरमें रहते नही. जिनके घर शीशे के होते है, उनको संभलकर रहना चाहिये.  अशी शेरेबाजी करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकंवर निशाना साधला. त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारण्यापूर्वी विचार करा,या प्रकरणी दुधका दुध..पाणी का पाणी केल्या शिवाय राहणार नाही असे विरोधकांना आव्हान देत,मी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नाही उलट तुम्ही खोटे आरोप केले म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी राजीनामा दयायला हवा असा पवित्राही मुख्यमंत्र्यांनी घेतला. या प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्रांची माफी मागावी अशी जोरदार मागणी सत्ताधारी सदस्यांनी केल्याने दोन्ही बाजूंनी झालेल्या गोंधळामुळे पंधरा मिनिटासाठी कामकाज तहकूब करावे लागले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

वंचित आघाडीने अशोक चव्हाण व सुशीलकुमार शिंदेंना हरविले

मुंबई – महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी केला. अशोक चव्हाण यांचा पराभव ‘वंचित’च्या यशपाल...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

बंद कर रे टीव्ही!

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोल्हापूर, सातारा, सांगली, औरंगाबाद, नांदेड, सोलापूर, मुंबई अशी जिथे जिथे भाषणे घेतली तेथील काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडले. याचा...
Read More
post-image
क्रीडा विदेश

#FrenchOpen फ्रेंच स्पर्धेत जोकोविचला नादाल, फेडररकडून धोका

पॅरिस – येत्या रविवारपासून सुरू होत असलेल्या यंदाच्या वर्षातील दुसर्‍या फ्रेंच ग्रँडस्लॅम अजिंक्यपद स्पर्धेत माजी विजेत्या नोवाक जोकोविचला नादाल-फेडररकडून धोका संभवतो. ही स्पर्धा दुसर्‍यांदा...
Read More
post-image
लेख

वृत्तविहार : जनतेचे ‘अभिनंदन’ करा  

पुढचा किमान महिनाभर लोकसभा निवडणुकीचे कवित्व चालू राहील. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते हा विजय एकट्या मोदींमुळे कसा मिळाला आणि काँग्रेसचे नेतृत्व कसे...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश राजकीय

हा जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे! पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली – आज लोकसभा निवडणूक २०१९चे निकाल जाहीर झाले. भाजपाने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयानंतर भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. पंतप्रधान...
Read More