सिग्नल यंत्रणेत बिघाड! पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने – eNavakal
आघाडीच्या बातम्या मुंबई वाहतूक

सिग्नल यंत्रणेत बिघाड! पश्चिम रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने

मुंबई – गोरेगाव स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक आज सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विस्कळीत झाली. या मार्गावरील मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याने कामावर निघालेल्या चाकरमान्यांना आणि उपनगरांतून मुंबईकडे निघालेल्या विद्यार्थ्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला. रेल्वे प्रशासनाकडून तातडीने सिग्नल यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले मात्र तब्बल एक ते दीड तासाच्या व्यत्ययानंतर हा बिघाड दुरुस्त करण्यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक संथ गतीने सुरू झाली. परंतु यादरम्यान उकाड्याने त्रस्त झालेल्या प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकमध्ये उतरून चालत पुढे जाण्याचा मार्ग स्वीकारला. यामध्ये महिला प्रवाशांचाही समावेश होता. दरम्यान, पश्चिम रेल्वेवरील वाहतूक अद्यापही पूर्ववत झालेली नसून २० मिनिटे उशिराने धावत आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने प्रवाशांना प्रचंड हाल सोसावे लागले.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

कांदा, टोमॅटोपाठोपाठ आता लिंबू महागले

कोल्हापूर – कांदा, लसूण आणि टोमॅटोपाठोपाठ आता लिंबूही महागला आहे. ऑक्टोबर हिट आणि निवडणूक प्रचाराचा काळ यामुळे लिंबाचा प्रतिनग दर पाच रुपये झाला आहे....
Read More
post-image
News आघाडीच्या बातम्या मुंबई

बेस्ट बोनसबाबत कोर्टात 22 ऑक्टोबरला पुढील सुनावणी

मुंबई – बेस्ट कर्मचार्‍यांमधील शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि भाजपाची कामगार संघटना या दोन संघटनांनी वेतनवाढीबाबत बेस्ट प्रशासनाशी करार केला आहे. मात्र इतर संघटनांना...
Read More
post-image
News मुंबई

‘# मोदी परत जा!’ आता मराठीतून हॅश टॅग सुरू! महाराष्ट्रातूनही विरोध

मुंबई -राज्यात निवडणूक प्रचारांची रणधुमाळी सुरू असताना मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र दौर्‍याला अनेकांकडून विरोध होताना दिसत आहे. काल रविवारी सकाळपासून ट्विटरवर ‘#...
Read More
post-image
News देश

सोशल मीडियावरील अकाउंटना आधार लिंक करणे गरजेचे नाही

नवी दिल्ली- बॅँकेपासून ते मॅट्रिमोनियल साईट्सपयर्र्ंत सर्वत्र आधार कार्ड अत्यावश्यक करण्यात आले आहे. त्याप्रमाणे सोशल मीडिया अकाउंटनाही आधार लिंक करावे या मागणीसाठी दाखल झालेली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

शाळेच्या परीक्षेची वेळ बदलून उस्मानाबादेत उद्धव ठाकरेंची सभा

उस्मानाबाद – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उस्मानाबादमधील प्रचारसभेसाठी शाळेच्या परीक्षेची वेळ बदलल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. एखाद्या राजकीय नेत्याच्या सभेसाठी विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचाच...
Read More