तिलारी घाटात कार दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू – eNavakal
News अपघात आघाडीच्या बातम्या

तिलारी घाटात कार दरीत कोसळून ५ जणांचा मृत्यू

बेळगाव –  बेळगाव चंदगड जोडणाऱ्या तिलारी घाटात झालेल्या  अपघातात लष्कर पॉइंट येथून आल्टो कार गाडी दरीत कोसळली.
या अपघातात पाच जण जागीच ठार झाल्याचे वृत्त असुन कारचा शोध घेणे दाट धुक्यामुळे शक्य होत नाही. या गाडीचा चक्काचूर झाला असुन  अपघातग्रस्त कारमधील ५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तसेच त्यांची नावे समजू शकलेली नाही. कारचा नंबर के ए वरुन सुरु होत असुन  कर्नाटक राज्य पासिंगची  कार असल्याचा अंदाज  चंदगड पोलीसांनी व्यक्त केला आहे.

हे पर्यटक असण्याची शक्यता असुन ते तिलारी घाटातील पिकनिक स्पॉटवर पर्यटनासाठी आले होते. पर्यटन आटोपुन परतीच्या  मार्गावर  जात असताना हा अपघात  तिलारी घाटात झाला. दाट धुक्यात रस्त्याचा अंदाज न आल्याने कार आधी रस्ता सोडुन पलटी झाली व नंतर खोल घाटात कोसळली. ही घटना रविवारी सायंकाळी सहा  वाजताच्या सुमारास घडली आहे. कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आपत्तिव्यवस्थापनच्या पथकाला पाचारण केले असुन ही हद्ग चंदगड कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत येते.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News मुंबई

वर्सोवा ते लोखंडवाला रस्त्याच्या बांधकामात कांदळवनांचा बळी

मुंबई – मुंबईकरांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी वर्सोवा ते लोखंडवाला लिंक रोड एमएमआरडीएच्या वतीने बांधण्यात येणार आहे. परंतु या मार्गासाठी कांदळवनांचा बळी जाणार असल्याचा...
Read More
post-image
News मुंबई

पालिका प्रसूतीगृहांमध्ये बसवणार सीसीटिव्ही कॅमेरे

मुंबई – देशात सर्वात मोठी पालिका म्हणून गणल्या जाणार्‍या मुंबई पालिकेने आपल्या रुग्णालय व प्रसूतीगृहांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या रुग्णालयातून नवजात...
Read More
post-image
News मुंबई

मुंबईत सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानकाचा मान ‘मुंबई सेंट्रल’ला मिळाला

मुंबई – मुंबई शहरातील सर्वोत्कृष्ट रेल्वे स्थानक म्हणून ‘मुंबई सेंट्रल’चे नाव समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पर्यवरणपूरकतेच्या तब्बल 12 कसोट्यांवर पात्र ठरल्याने मुंबई सेंट्रल...
Read More
post-image
News महाराष्ट्र

पुरामुळे साखर महाग झाली दुसर्‍यांदा दरवाढ! 40 रुपये किलो

कोल्हापूर – पूरस्थिती पूर्णपणे निवळत चालली असली तरी या कोल्हापूर आणि सांगलीच्या पुराचा फटका साखरेला बसला आहे. साखरेचे भाव दुसर्‍यांदा वाढले आहेत. मागील आठवड्यात...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

राज्यातील महापूर प्रशासकीय गलथानामुळे आरोप करणारी जनहित याचिका हायकोर्टात

मुंबई – कोल्हापूर, सांगलीसह राज्यात उद्भवलेली महापूरस्थिती ही प्रशासकीय गलथानपणा आणि धरणातील पाणी सोडण्यासंदर्भात केंद्रीय जल आयोगाच्या निर्देशांचे बेदरकार उल्लंघन झाल्याचा आरोप करून कर्नाटक...
Read More