सासू-सासर्‍यांचे घर मुलगा-सुनेने सोडावे; कोर्टाचे आदेश – eNavakal
News न्यायालय मुंबई

सासू-सासर्‍यांचे घर मुलगा-सुनेने सोडावे; कोर्टाचे आदेश

मुंबई – ज्येष्ठ नागरिक दांपत्याच्या फ्लॅटवरील मालकी अधिकार शाबूत ठेवत सेशन्स कोर्टाने त्यांचा मुलगा आणि सूनेला घर सोडून जाण्यास फर्मावले आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणी मॅजिस्ट्रेट कोर्टाने डिसेंबर 2017 मध्ये दिलेले अंतरिम आदेश गेल्या आठवड्यात सेशन्स कोर्टाने कायम ठेवले. इतकेच नाही, तर सेशन्स कोर्टाने सून सोनाली सावंत यांना तीन महिन्यांचे भाडे म्हणून 30 हजार रुपये सासू-सासर्‍यांना देण्याचे आदेश दिले आहेत.
37 वर्षीय सोनाली सावंत यांनी दाखल केलेली याचिका सेशन्स कोर्टाने फेटाळून लावली. वृद्ध आई-वडिलांची काळजी घेणे ही याचिकाकर्त्या आणि त्यांच्या पतीची जबाबदारी आहे. मात्र त्यांना या वयात कोर्टाच्या प्रक्रियांना सामोरे जावे लागत आहे, अशा शब्दांत कोर्टाने सोनाली यांना फटकारले. मालती आणि श्रीधर सावंत यांना 5 हजार रुपये देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. मालती आणि श्रीधर सावंत यांनी गेल्या वर्षी माझगाव महानगरीय मॅजिस्ट्रेट कोर्टात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली होती. मुलगा आणि त्याच्या पत्नीला घरात शिरण्यास मज्जाव करण्याची मागणी त्यांनी कोर्टाकडे केली होती. मॅजिस्ट्रेट कोर्टाने मुलगा-सुनेला घरात शिरण्यास प्रतिबंध करणारे आदेश बजावले होते. मुंबईतील परेल भागात सावंत दाम्पत्याच्या नावे फ्लॅट आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

गॅलरीतून डोकावणार्‍या मुलीचा तिसर्‍या मजल्यावरून पडून मृत्यू

भिवंडी- शहराच्या मुस्लीम वस्तीच्या इस्लामपुरा परिसरातील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्याच्या गॅलरीतून डोकावणार्‍या आठ वर्षीय मुलीचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना काल सायंकाळी घडली...
Read More
post-image
News महाराष्ट्र

डॉ. आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटनेत राडा

औरंगाबाद- वसतीगृहाच्या मुद्यावरून कुलगुरूंच्या केबिनमध्ये दैनंदिन वापराच्या वस्तू मांडल्याने अभाविप आणि दलित विद्यार्थी संघटना आपापसात भिडल्याची घटना घडली. याप्रकरणी उद्या दलित विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठ...
Read More
post-image
News महाराष्ट्र

उसाचे बिल न दिल्याच्या कारणावरून प्रहारचे आंदोलन

सोलापूर- एफआरपीची रक्कम मिळावी आणि मागील वर्षाचे उसाचे बिल मिळावे यासह विविध मागण्यांसाठी सोमवारी प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांची प्रतिकात्मक...
Read More
post-image
News महाराष्ट्र

12 हजार ग्राहकांचा पुरवठा आठ तास खंडित

वसई –  महावितरणच्या वसई उपविभागांतर्गत येणार्‍या सातीवली गावातील 22 केव्ही ट्रान्सफॉर्मरच्या यंत्रणेशी अज्ञात व्यक्तीने छेडछाड केल्यामुळे 12 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा चार दिवसांपूर्वी बाधित होऊन...
Read More
post-image
News अपघात

दर्शनावरून परतणार्‍या भाविकांच्या कारला अपघात ! 8 जखमी

महागाव – माहुर येथुन देवदर्शन करून परत येणार्‍या भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. अपघातात 3 महिला गंभीर जखमी झाल्या असून पाचजण किरकोळ जखमी...
Read More