‘सावाना’च्या पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल-गिरीष महाजन – eNavakal
महाराष्ट्र

‘सावाना’च्या पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल-गिरीष महाजन

नाशिक – सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे प्रदान करण्यात आलेल्या माजी आमदार  कै.माधवराव लिमये यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या कार्यक्षम आमदार पुरस्कारामुळे जनसेवेची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी केले.
औरंगाबादकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात श्री.महाजन यांचा पद्मश्री डॉ.अभय बंग यांच्या हस्ते कार्यक्षम आमदार पारितोषिक देवून सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, महापौर रंजना भानसी, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्याध्यक्ष अभिजित बगदे, सचिव श्रीकांत बेणी, संपादक शैलेद्र तनपुरे, भानुदास शौचे आदी उपस्थित होते.
श्री.महाजन म्हणाले, विधानसभा हे लोकशाहीचे पवित्र मंदिर आहे. याठिकाणी वंचितांचे प्रश्न मांडण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. गरिबांच्या मुलांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि गरजूंना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावा याकडे अधिक लक्ष देण्याचा प्रयत्न आहे. सार्वजनिक जीवनात वावरतांना व्यक्तिगत प्रतिष्ठेपेक्षा जनतेचे प्रश्न सोडविण्यात जास्त समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
नाशिक शहर संस्कृतिचे माहेरघर असल्याचा उल्लेख करून सार्वजनिक वाचनालय हा सांस्कृतिक चळवळ पुढे नेणारा शहराचा मानबिंदू आहे, अशा शब्दात त्यांनी वाचनालयाच्या कामगिरीचा गौरवपुर्ण उल्लेख केला. वाचनालयाचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुरस्कार कोणी दिला आणि कोणाच्या हातून मिळाला याला महत्व असल्याचे नमूद करून  डॉ.बंग यांच्यासारख्या नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्या  सेवाभावी व्यक्तीच्या हातून पुरस्कार मिळणे हा जीवनातील आनंदाचा क्षण असल्याचे श्री.महाजन म्हणाले.
पुरस्कारासाठी करण्यात आलेली श्री.महाजन यांची ओळख योग्‍य असल्याचा उल्लेख करीत डॉ. बंग म्हणाले, पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आणि त्या व्यक्तिचे चारित्र्य कसे आहे यावरून पुरस्काराची उंची ठरते. सावानातर्फे देण्यात येणारा कार्यक्षम आमदार पुरस्कार कर्तबगार व्यक्तिंना देण्यात आल्याने त्याला विशेष महत्व आहे. श्री.महाजन स्वस्थ जीवनशैलीचे आदर्श असल्याने    तसेच प्रामाणिकपणे आपले कर्तव्य पार पाडत असल्याने त्यांची पुरस्कारासाठी निवड योग्य असल्याचे , त्यांनी सांगितले.
आरोग्याचे विविध प्रश्न समोर येत असताना निरोगी जीवनशैलीचा वापर दैनंदिन जीवनात करणे आवश्यक आहे. रोगनिर्मितीच्या नव्या कारणांचे समाजातून उच्चाटन होणे आवश्यक असून त्यासाठी वैद्यकीय तसेच सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिंनी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात श्री.बेणी यांनी पुरस्कार निवडीविषयी माहिती दिली. कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
अर्थ आघाडीच्या बातम्या देश

Budget 2020 : वाचा! नव्या अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले?

नवी दिल्ली – २०२०-२१ सालचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे कररचनेत करण्यात आलेला बदल. तसेच, शिक्षण, कृषी, आरोग्य,...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या

पुणे जिल्हा परिषद निवडणूक; अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे

पुणे – पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने  वर्चस्व कायम ठेवले आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या निर्मला पानसरे तर उपाध्यक्षपदी रणजित शिवतारे यांची निवड करण्यात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

देशात गरिबी, उपासमार, असमानता वाढली, एमपीआयचा धक्कादायक अहवाल

नवी दिल्ली – देशाचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असताना आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशातील 22 ते 25 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या महाराष्ट्र

मोदींच्या आवाहनाला सोलापुरात गालबोट, विमानतळ परिसरात आग

सोलापूर – दिवा पेटवण्याचे आवाहन करण्यात आले असताना काही अतिउत्साही लोकांनी फटाके फोडल्याने मोठी आग सोलापुरात लागली आहे. सोलापूर विमानतळ परिसरात ही आग लागली...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

फटाके फोडून परिस्थितीचे गांभीर्य घालवले? सोशल मीडियावर टीकेची झोड

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत लोकांनी दारासमोर दिव्यांची उजळण केली. मात्र काही अतिउत्साही लोकांना परिस्थितीचे गांभीर्यच नसल्याचे समोर आले...
Read More
post-image
देश

कोरोनाविरोधात लढण्यासाठी हरभजन सिंगचाही पुढाकार

नवी मुंबई – लॉकडाऊनच्या काळात अनेकजण उपाशी झोपत आहेत. हातात काम नसल्याने हातावर पोट असलेल्या लोकांना पोटाची खळगी भरून काढण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे....
Read More
post-image
Uncategoriz आघाडीच्या बातम्या देश

दिवे, मोबाईल, मेणबत्तींनी उजळून निघाला आसमंत सारा

मुंबई – देशातील एकात्मता दिसण्याकरता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर ९ वाजता दिवे, मेणबत्त्या किंवा मोबाईलचा टॉर्च लावण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला देशभरातील...
Read More
post-image
आघाडीच्या बातम्या देश

राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ७४८, मुंबई डेंजर झोनमध्ये?

मुंबई – आज राज्यात दिवसभरात ११३ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७४८ झाली आहे. तर, आतापर्यंत ५६ जणांनी कोरोनापासून स्वत:ची सुखरूप...
Read More