सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने केले विष प्राशन – eNavakal
महाराष्ट्र

सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याने केले विष प्राशन

बुलढाणा – खामगाव तालुक्यातील कांचनपुरा येथे एका युवा शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून विष प्राषण केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली. रवींद्र तोताराम खानझोडे (वय 26) या शेतकऱ्याने आपली शेती गहान ठेऊन सावकार श्रीधर पाटीलकडून कर्ज घेतले होते, त्या कर्जाची व्याजासकट परतफेड करून आपली शेती ताब्यात घेण्यासाठी गेला होता, सावकाराच्या अजब कारभारामुळे रवींद्रने विष प्राषण करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, मात्र स्थानिकांच्या जागरुकतेमुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

युवा शेतकरी रवींद्र खानझोडे याने दोन वर्षापुर्वी सावकार श्रीधर पाटील याच्याकडून आपली शेती गहान ठेऊन चार लाखांचे कर्ज घेतले होते, त्या कर्जाची सावकारी व्याजानुसार तब्बल आकरा लाखांची रक्कम परत करून आपली जमीन ताब्यात घेण्याच्या उद्देशाने रवींद्र सावकाराकडे गेला असता, सावकाराने पैसे घेण्यास नकार देऊन जमीनीवर आपला मालकी हक्क दाखवला. धक्कादायक म्हणजे त्या जमीनीवर पेरलेले पीकसुध्दा सावकाराने नष्ट केले. ठरलेल्या व्याजानुसार कर्जाची परतफेड करूनसुध्दा शेतावर मालकीहक्क गाजवणाऱ्या सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकरी रवींद्रने अखेर शेतामध्ये विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सावकाराची हुकूमशाही आजून किती दिवस शेतकर्यांचे बळी घेणार आहे, असा प्रश्न आता स्थानिकांकडून समोर येत आहे.

Sharing is caring!

You may also like

Read More

post-image
News महाराष्ट्र

आज पुणे शहरातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील अशुद्ध जलउपसा केंद्रातील आणि निगडी सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत पुरवठाविषयक कामे आज गुरुवारी केली...
Read More
post-image
News देश

चंद्राबाबू नायडूंचा ‘प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत जमीनदोस्त

अमरावती – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या आदेशानंतर माजी मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांचा ’प्रजा वेदिका’ बंगला एकाच रात्रीत...
Read More
post-image
News मुंबई

243 महिला बचत गटांना पालिकेची नोटीस! पालिका स्थायी समितीत उमटले पडसाद

मुंबई – देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील चक्क 250 पैकी 243 महिला बचत गटांना तांदूळ अपहार प्रकरणी दोषी ठरवून पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. या...
Read More
post-image
News महाराष्ट्र मुंबई

महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भुखंड प्रकरणात बिल्डरचे हित जोपासले

मुंबई – महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील दोन भुखंड प्रकरणात बिल्डरला फायदा होईल असे निर्णय दिले आहेत, असा खळबळजनक आरोप आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष...
Read More
post-image
News महाराष्ट्र

नागपूर महापालिकेचा अर्थसंकल्प सादर बंद! शाळांमध्ये भाजी मार्केट-फूड मॉल

नागपूर – नागपूर महापालिकेचा 3197. 60 कोटींचा अर्थसंकल्प सादर झाला असून त्यात कोणतीही करवाढ, दरवाढ करण्यात आली नसली तरी पालिकेचं उत्पन्न वाढवण्यासाठी पालिकेच्या बंद...
Read More